Video : सुप्रीम कोर्टानेही जामीन फेटाळल्यानंतर नार्वेकरांनी केलेल्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, शेअर केला हा व्हिडिओ

मिलिंद नार्वेकर ट्विटमध्ये म्हणतात, लघु सुक्ष्म दिलासा!. त्याला आता त्यांना नितेश राणे यांनीही प्रत्युत्तर दिलंय. नितेश राणे यांनी एक सूचक व्हिडिओ ट्विट केला आहे.

Video : सुप्रीम कोर्टानेही जामीन फेटाळल्यानंतर नार्वेकरांनी केलेल्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, शेअर केला हा व्हिडिओ
नितेश राणे, आमदार
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 10:10 PM

मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात आधी सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा (Nitesh Rane) जामीन फेटाळल्याने टेन्शन वाढलं, त्यानंतर राणेंनी हायकोर्टात धाव घेतली, मात्र तिथंही दिलासा मिळाला नाही, त्यानंतर राणे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेले मात्र तिथही त्यांना दिलासा मिळाला नाही, नितेश राणेंचा जामीन सुप्रीम कोर्टानेही फेटाळून लागवाला, नितेश राणे याचा जामीन फेटाळल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी (Milind Narvekar) एक ट्विट केले आहे. त्यात फक्त एका वाक्यात झणझणीत प्रतिक्रिया दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, लघु सुक्ष्म दिलासा!. नार्वेकरांच्या या ट्विटरवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यावर एका नेटकऱ्याने मातोश्रीचा घरगडी म्हणत टीका केलीय. तर आता त्यांना नितेश राणे यांनीही प्रत्युत्तर दिलंय. नितेश राणे यांनी एक सूचक व्हिडिओ ट्विट केला आहे.

नितेश राणेंचे ट्विट काय?

नितेश राणे यांनी एका चित्रपटातला एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओतला डायलॉग आहे, परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेव्हढाच तिकट, त्यामुळे राणेंचा हा रोख कुणाकडे आहे, स्पष्ट कळून येते. दुसरीकडे सिंधुदुर्गात सध्या राणेंच्या फोटोसह, “तुम लाख कोशीश करलो मुझे बरबाद करने की, मै जब जब बिखरा हू दुगनी रफ्तार से निखरा हू” असा असायच्या पोस्टीह व्हायरल होत आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

मिलिंद नार्वेकरांचे ट्विट काय?

पुढच्या दहा दिवसात नितेश राणे यांनी नियमित जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करायचा आहे. त्याकरता दहा दिवसांची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे, असे राणेंचे वकील देसाई यांनी सांगितले, पण कोर्टाने ऑर्डरपास करून त्यांना नियमित जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितलं आहे, असं देसाई म्हणाले. अटकपूर्व जामीन म्हणजे अटक होण्याच्या अगोदर किंवा अटक झाल्या झाल्या सीआरपीसी 438 नुसार अर्ज करता येतो. रेग्युलर जामीन म्हणजे अटक झाल्यानंतरचा जामीन असतो. त्यामुळे सेशन कोर्टात जाऊन आम्हाला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करावा लागेल. फरक फक्त एवढाच की आम्ही स्वत:हून गेलो असलो तरी आम्हाला अटक झालेली नसेल. आम्ही पोलिसांच्या कस्टडीत नसू. त्यामुळे आम्हाला दहा दिवसांचं संरक्षण आहे, असेही त्यांनी सांगितलं.

Narvekar on Nitesh Rane : नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर नार्वेकरांचे खोचक ट्विट, झणझणीत वाक्याने भाजप कार्यकर्ते खवळले!

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

किरीट सोमय्या म्हणाले, जय पवार यांचे कारनामे उघड करणार; अजित पवार म्हणतात, महत्त्व देण्याची गरज नाही

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.