Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | देवेंद्र फडणवीस यांनी गायले नजरे मिलते नजरोंसे…गाणे, नितीन गडकरी यांनी काय केले?

nitin gadkari and devendra fadnavis | भारतीय जनता पक्षाचे दोन दिग्गज नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस. एकाचे काम राज्यपातळीवर तर दुसऱ्याचे काम देशपातळीवर. दोन्ही नेते आपल्या वेगवेगळ्या गुण आणि शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. निवांत वेळ मिळाल्यावर ते आपला कुटुंब आणि छंद यांचा चांगला संगम करतात.

Video | देवेंद्र फडणवीस यांनी गायले नजरे मिलते नजरोंसे...गाणे, नितीन गडकरी यांनी काय केले?
nitin gadkari and devendra fadnavisImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 11:51 AM

गजानन उमाटे , नागपूर | 5 नोव्हेंबर 2023 : राजकारणातील दिग्गज नेत्यांना कुटुंब आणि आपल्या छंदासाठी वेळ काढणे नेहमी अवघड असते. परंतु कुठे संधी मिळाली तर ते सोडत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवांत वेळेत आपल्या नातीसाठी खरेदीसाठी गेल्याचे काही दिवसांपूर्वी दिसले होते. मग बालहट्ट पुरवण्यासाठी नितीन गडकरी थेट खेळण्याच्या दुकानात पोहचले होते. संपूर्ण दुकानभर फिरून त्यांनी आपल्या नातीसाठी काही खेळणी घेतली होती. आजोबा गडकरी यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांच्या छोट्या परीसाठी त्यांनी सायकलही घेतली होती. उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस कधी मुलींच्या शाळेत गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता दोघं नेत्यांनी गाणे म्हटलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गायले पुष्पा चित्रपटातील गाणे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पा चित्रपटातील गोण्याचे बोल म्हटले. एका लग्न सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी “नज़रें मिलते ही नज़रों से नज़रों को चुराए कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए” या गाण्याचे बोल म्हटले. यावेळी उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांना पुष्पा चित्रपटातील हे गाणे चांगलेच आवडल्याचे स्पष्ट झाले.

नितीन गडकरी यांनी कोणते गाणे म्हटले

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांची गाणे म्हणण्याची वेळी आली. मग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी गाणे गायले. फडणवीस यांची आवड नवीन चित्रपट होतो. परंतु गडकरी यांची आवड जुने गाणे होते. गुलजार यांनी लिहिलेले गाणे त्यांनी म्हटले. लता मंगेशकर आणि अनुप घोषल यांनी हे गाणे गायले आहे. 1983 मध्ये आलेले मान्सून या चित्रपटातील “तुझसे नाराज नही जिंदगी” हे गीत गात नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांनी उपस्थितांची दाद मिळवली.

कुठे गायली ही गाणी

नागपूरमधील उद्योजक प्यारे खान यांच्या मुलीच्या लग्नाचे रिशेप्शन होते. या कार्यक्रमास नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी दोन्ही नेत्यांनी गीत गायले. यामुळे रिशेप्शन आलेल्या लोकांना आनंद द्विगुणीत झाला.

मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.