AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराजांचं मुला-मुलीच्या जन्माबाबत सम-विषम वक्तव्य, 8 महिन्यांनी कोर्टाचा मोठा निकाल

इंदोरीकर महाराजांविरोधातील खटला संगमनेर कोर्टानं रद्द केला आहे. (Nivrutti Maharaj Indorikar )

Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराजांचं मुला-मुलीच्या जन्माबाबत सम-विषम वक्तव्य, 8 महिन्यांनी कोर्टाचा मोठा निकाल
इंदोरीकर महाराज
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 7:24 PM

अहमदनगर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्यासंबंधी दिलासा मिळाला आहे.  लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. आता इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांचे अपील मंजूर केले आहे. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात त्यांनी अपील केले होते. न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देत खटला रद्द करण्यात आला आहे.(Nivrutti Maharaj Indorikar got relief in case of girl child born statement)

इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांचा जल्लोष

संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयानं इंदोरीकर महाराज यांच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पेढे वाटून जल्लोष केला.

काय आहे प्रकरण?

“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

अंनिस सह सामाजिक संघटनांची न्यायालयात

इंदोरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती.

इंदोरीकर महाराज यांनी हे वक्तव्य कुठे आणि कधी केले, याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा करुन या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावले असून कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलं होतं.

संबंधित बातम्या

मुला-मुलीच्या जन्माबाबत सम-विषम वक्तव्य भोवलं, इंदोरीकर महाराजांवर गुन्हा

Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहावंच लागणार!

(Nivrutti Maharaj Indorikar got relief in case of girl child born statement)

पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.