VIDEO | माझ्या क्लिपा यूट्यूबवर टाकून 4 हजार जण कोट्यधीश, त्यांचं वाटोळं होईल, दिव्यांग मुलं जन्माला येतील : इंदुरीकर

आपल्या किर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी करुन नवा वाद निर्माण केला आहे.

VIDEO | माझ्या क्लिपा यूट्यूबवर टाकून 4 हजार जण कोट्यधीश, त्यांचं वाटोळं होईल, दिव्यांग मुलं जन्माला येतील : इंदुरीकर
इंदुरीकर महाराजImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 9:07 AM

अकोला : वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कीर्तनाच्या व्हिडीओ क्लीप तयार करुन यूट्यूबवर (YouTube) अपलोड करणाऱ्या तरुणांवर इंदुरीकरांनी चांगलाच संताप व्यक्त केला. “माझ्या जीवावर 4 हजार जणांनी यूट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आहेत, आणि याच लोकांनी मला अडचणीत आणलं. यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल” असं म्हणत दिव्यांग शब्दाकडे निर्देश करणारे हातवारे इंदुरीकरांनी केले. सोमवारी रात्री अकोला शहरातील कौलखेड भागात त्यांचं कीर्तन झालं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं.

आपल्या किर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी करुन नवा वाद निर्माण केला आहे. अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन आयोजित केलं होतं. आपल्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आणि याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलं, अशी तक्रार इंदूरीकर महाराजांनी आपल्या किर्तनातून व्यक्त केली.

इंदुरीकर नेमकं काय म्हणाले?

चार हजार यूट्यूबवाले कोट्यधीश झाले माझ्या नावावर, नालायकांना पैसे मोजता येईना, आणि माझ्यावरच चढले, माझ्यावर पैसे कमावले, क्लिपा माझ्यावर तयार केल्या, यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल (हातवारे) हा विनोद नाही, जे सत्य आहे ते

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Video : ‘टपरीवाला असला तरी चालेल पण निर्व्यसनी हवा, माझी पोरगी सुखी राहील’, Indurikar महाराजांचं कीर्तन Viral

Viral Video: भंगार बापाची पैदास… तुह्या बापाला जाळ ना; इंदोरीकरांचा हा ‘रावण’ 12 मिनिटं ऐका, पुन्हा ‘रावणदहन’ करणार नाही!

Trupti Desai | इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता, तृप्ती देसाईंनी सरकारकडे केली महत्त्वाची मागणी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.