Shivsena-BJP भविष्यात एकत्रं येणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान; कारणही सांगितलं
भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं 25 वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही.
नागपूर: भविष्यात शिवसेना-भाजप (shivsena-bjp) एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं 25 वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी नागपुरात मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून युतीच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. तसेच शिवसेनेची आगामी वाटचाल काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीसोबतच होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. भाजपचा भगवा आहे की नाही? भगव्याचा दांडा फक्त आमचाच आहे. भाजपचा आहे की नाही माहित नाही, असा चिमटाही राऊत यांनी काढला. तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना नेते संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना पूर्णविरामही दिला. जीना यांनी एक फाळणी केली तुम्ही रोज फाळणी करता, असा टोला लगावतानाच एमआयएमशी आघाडी होणार नाही. हे सांगणारा मी पहिला माणूस आहे. एमआयएमने उत्तर प्रदेशात भाजपची बी टीम म्हणून काम केलं. त्यामुळे समाजवादी पार्टीचं मोठं नुकसान झालं. मतांची आकडेवारी पाहिल्यावर एमआयएम कुणासाठी काम करते हे दिसून येतं, असं राऊत म्हणाले.
भागवतांना भेटणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपचा मार्गदर्शक आहे. मग आमचे मार्गदर्शक का नाही? आम्ही मोहन भागवत यांना भेटणार, असं राऊत म्हणाले.
आघाडीने एकत्र लढावे
किमान समान कार्यक्रमावर राज्यात सरकार बनले आहे. कुणीही आपला पक्ष इतर पक्षात विलीन केला नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडीने एकत्र मनपा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. पण तसं झाले नाही. तर आम्ही स्वबळावर लढू, असं ते म्हणाले.
पार्थ पवारांचा विचार राष्ट्रवादीने करावा
मावळचे आप्पा भारणे आहे तेच राहतील. पार्थ पवार तरुण आहे त्यांचा विचार त्यांचा पक्ष करेल. आमच्याकडे काही प्रस्ताव आला तर त्यावर बोलू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मलिकांचा राजीनामा घेणार नाही
नवाब मलीक यांचा राजीनामा घेणार नाही. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही चूक होती. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाई घाईत झाला. थोडं संयमाने घ्यायला हवं होत, अशी कबुलीही त्यांनी दिली.
संबंधित बातम्या:
Video – केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय, Sanjay Raut यांचा भाजपवर निशाणा
MIMला विरोध, पण शिवसेनेची मुस्लिम लीगसह सेक्युलर पक्षांशीही अनेकदा युती, इतिहास काय सांगतो?
ठाकरे सरकारचा गृहनिर्माण संस्थासाठी मोठा निर्णय, शासकीय निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीमधून सूट