…त्याशिवाय आचारसंहिता जाहीरच होणार नाही, काय म्हणाले जरांगे ?
मराठा, दलित, मुस्लिम एकत्र आले तर परिवर्तन होणार आहे.सर्वांची अशी इच्छा असेल तर विधानसभेला अशी बांधणी होऊ शकते, मराठ्यांचे एक लाखा पेक्षा जास्त मतदान प्रत्येक मतदार संघात आहे, परंतु हे सर्व एकत्र आले तर ते देणारे बनतील. देणारे बनण्याची संधी सर्वांनी घ्यायला पाहिजेआणि प्रकाश आंबेडकर यांनी ही संधी घ्यायला पाहिजे, ही संधी 70 वर्षात पहिल्यांदा आली आहे असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
नारायण गडाचा दसरा मेळावा बघून त्यांचे डोळे उघडले असतील. मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देणे सरकारला भाग आहे.त्याशिवाय आचारसंहिता जाहीरच होणार नाही असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की आजच्याच दिवशी करोडो समाज अंतरवालीत जमला होता, आजच्याच दिवशी आपल्या लेकरांसाठी, शेतकरी आणि ओबीसीसाठी उठाव झाला होता. समाज खुप लढला आहे आणि त्याचे मी चीज करणार आणि मराठा समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. मराठा समाज त्यांच्या पाठीशी होता. पण आता मुसलमान, दलित, गोरगरीब, ओबीसी विरोधात आहेत. त्यांच्याविरोधात साडेतीन कोटी समाज गेला आहे असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
जरांगे पुढे म्हणाले की ज्यांची मागणी नाही त्या पंधरा जातींना मराठ्यांच्या नाकावर टिचून आरक्षण दिले आहे.आमच्या 57 लाख नोंदी असून आरक्षण देत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सांगतो आम्हाला राजकारण करायचे नाही, तुमच्या खुर्च्या तुम्हीच सांभाळा, तुमची मजा तुम्हीच करा, मराठ्यांच्या विरोधात फडवणीस यांनी जाऊ नये, नाहीतर मराठा समाज तुम्हाला अस्मान दाखवल्या शिवाय राहणार नाही असेही जरांगे यांनी यावेळी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचे आमदार निवडून द्यावे अशी विनंती जरांगे यांना केली आहे. त्याविषय़ी विचारले असता त्यांनी त्यावर चर्चा होईल.ते येतील, आम्ही त्यांचा कधीही सन्मानच केला आहे. समाज आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. आम्ही त्यांना कधीच डावलले नाही, सर्व सामान्य दलित, ओबीसी, मराठा, मुस्लिम यांना वाटते की आता या लाटेत आपण एकजूट राहिले पाहिजे,तरच शंभर टक्के गरीबांची सत्ता येऊ शकते आणि प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आणि गरीबांच्या बाजूने राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.
मुंबईतील लोकच मतदान करतात का ?
येत्या निवडणूकीत उमेदवार उभे करणार का ? यावर ते म्हणाले की त्यांचे एकदा होऊ द्या,त्यांच्या याद्या येऊ द्या, त्या याद्या कशा आहेत बघु द्या.त्यानंतर आम्ही काय तो निर्णय घेणार. त्यांना मागे सरकता नाही आले पाहिजे, गेमच टाकणार असेही मनोज जरांगे यांनी सांगितले. मुंबईतील पाच टोल नाक्यांवर टोलमाफी झाली आहे यावर विचारले असता त्यांना काय मुबाईतील लोकच मतदान करतात का..? महाराष्ट्रामधील लोक त्यांना मतदान करत नाहीत का..? सर्वच टोल नाके सर्वच फ्री करू गोरगरीबांचे कल्याण होऊ द्या अशीही मनोज जरांगे यांनी केली.