ठाण्यात मॉलमध्ये जायचंय?; मग हे वाचाच, नाही तर भारी पडेल!

मुंबईलाच नव्हे तर ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना कोरोनाचा विळखा पडला आहे. (no entry in thane shopping malls without covid-19 negative report from tomorrow)

ठाण्यात मॉलमध्ये जायचंय?; मग हे वाचाच, नाही तर भारी पडेल!
शॉपिंग मॉल, प्रातिनिधिक चित्रं
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 8:10 PM

ठाणे: मुंबईलाच नव्हे तर ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना कोरोनाचा विळखा पडला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अत्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ठाण्यातही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. ठाण्यात आता मॉलमध्ये जाणंही महागात पडणार आहे. त्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी काही निर्बंध जारी केले आहेत. (no entry in thane shopping malls without covid-19 negative report from tomorrow)

शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मॉलमध्ये प्रवेश करताना अँटीजन कोरोना चाचणी करावी लागणार असून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिली. शहरात वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. शहरातील मॉल्स, तसेच मार्केटमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. नागरिकांची गर्दी कमी करून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून मॉल्समध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांची अँटीजन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे शहरातील सर्व मॉल्समध्ये उद्यापासूनच अँटीजन चाचणी सुरू होणार करण्यात येणार असून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच मॉल्समध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

आज 793 रुग्ण सापडले

ठाण्यात आज 793 कोरोना रुग्ण सापडले. त्यामळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 5499 झाली आहे. ठाण्यात आज दिवसभरात एकूण 310 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 64137 झाली आहे. कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संघ्या 1374वर गेली आहे.

नवी मुंबईत ‘मिशन ब्रेक द चेन’

नवी मुंबई प्रशासनानेही आता मिशन ब्रेक द चेन अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, उद्यानं, बाजार यांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. नियमांचा भंग होत असेल तर तात्काळ कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार आता मॉलमध्ये प्रवेश देताना प्रत्येक अभ्यागताची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. गेल्या 72 तासांमधील कोरोना चाचणी (RT-PCR) अहवाल निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर शॉपिंग मॉलमध्ये योग्य सामाजिक अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं आढळल्यास प्रत्येक वेळी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

राज्यात कठोर निर्बंध?

महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार सातत्याने वाढत आहे. स्थानिक पातळीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं कळंतय. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत राहिली तर लॉकडाऊन बाबत विचार केला जाईल. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं आरोग्यमंत्र्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. (no entry in thane shopping malls without covid-19 negative report from tomorrow)

राज्यातील सर्वाधिक कोरोना संसर्ग असलेली शहरे

पुणे नागपूर मुंबई ठाणे नाशिक औरंगाबाद नांदेड जळगाव अकोला (no entry in thane shopping malls without covid-19 negative report from tomorrow)

संबंधित बातम्या:

नवी मुंबईत ‘जम्बो कोव्हिड लसीकरण केंद्र’, पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचं ‘मिशन लसीकरण’ जोरात!

अनेक दिवसांपासून ग्राहकांची तुफान गर्दी, सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, कल्याणचा डी मार्ट पाच दिवसांसाठी सील

पालघरमध्ये कोरोनाचा विस्फोट, आश्रमशाळेतील 30 विद्यार्थी पॉझिटिव्ह

(no entry in thane shopping malls without covid-19 negative report from tomorrow)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.