Mumbai Power Cut | मुंबईतील रुग्णालयांमधील वीज पुरवठा खंडित नाही: आयुक्त चहल
मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाल्याच्या बातम्याही पसरलल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी तातडीचे निवेदन काढून मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला असला तरी त्याचा मुंबई पालिकेच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला नसल्याचं म्हटलं आहे.
मुंबई: मुंबईतील रुग्णालयांमधील वीज पुरवठा खंडित झालेला नाही. विशेष: आयसीयूमधील वीज पुरवठ्यावर परिणाम झालेला नसून आठ तास वीज पुरवठा खंडित होणार नाही एवढा जनरेटरसाठीचा डिझेल साठा पालिकेकडे असल्याचं पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं. (no power failures in hospitals, says I S Chahal)
मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाल्याच्या बातम्याही पसरलल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी तातडीचे निवेदन काढून मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला असला तरी त्याचा मुंबई पालिकेच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला नसल्याचं म्हटलं आहे.
पालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील वीज पुरवठा जनरेटरच्या माध्यमातून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयातील वीज पुरवठ्यावर काहीच परिणाम झाला नसून आयसीयूमधील वीज पुरवठ्यावरही परिणाम झालेला नाही. महापालिकेच्या गॅरेजमध्ये आठ तास जनरेटर सुरू राहील एवढा डिझेलचा पुरवठा असल्याचं चहल यांनी स्पष्ट केलं.
मुंबई लोकलला फटका
दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेला याचा फटका बसला आहे. मुंबईत वीजपुरवठा खंडीत झाल्याने पश्चिम, मध्य या रेल्वेला फटका बसत आहे. कामावर जाण्यासाठी निघालेले अनेक चाकरमानी रेल्वेत खोळंबले आहे. लोकलमधील वीज आणि पंखे बंद आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना आता वीज खंडीत झाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सिग्नल यंत्रणा बंद
मुंबईतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणाही ठप्प झाल्या आहे. रस्त्यावरील सर्वच ठिकाणच्या सिग्नल हे बंद पडले आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी ट्राफिक जाम होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
रुग्णालय, परीक्षांना फटका
मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता आहे. अनेक रुग्णालयांकडे पावर बॅक अप आहे का, जनरेटर आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन परीक्षांनाही याचा फटका बसला आहे. काही विद्यार्थ्यांना अंधारात, तसेच प्रचंड उकाड्यात पेपर द्यावा लागत आहे. (no power failures in hospitals, says I S Chahal)
#powercut मुंबईतील वीज गायब, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची प्रतिक्रिया @NitinRaut_INC pic.twitter.com/fp4TU3vwfN
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2020
मुंबईत कोणकोणत्या भागात वीज गायब?
दादर लालबाग परळ प्रभादेवी वडाळा ठाणे नवी मुंबई पनवेल बोरिवली मालाड कांदिवली
संबंधित बातम्या:
mumbai power cut ! मुंबई-ठाण्यातील बत्तीगुल झाल्याने रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका
Mumbai Power Cut: मुंबईची बत्ती गुल; कार्यालये आणि रेल्वे वाहतूक ठप्प
Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल
(no power failures in hospitals, says I S Chahal)