ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा, गुरुवारपासून अनिश्चित काळासाठी लसीकरण बंद
ठाण्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारपासून पुढील आदेश येईपर्यंत ठाण्यातील लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे.
ठाणे: ठाण्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारपासून पुढील आदेश येईपर्यंत ठाण्यातील लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये, असं आवाहन ठाणे पालिकेने केलं आहे. (no vaccination in thane due to heavy rain lashes)
दिनांक 9 ते 12 जून या काळात मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व केंद्रावरील लसीकरण उद्या 10 जूनपासून बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. लसीकरणाबाबत पुढील निर्देश येईपर्यंत सर्व केंद्रावरील लसीकरण बंद राहणार असून नागरिकांनी यांची नोंद घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
4 लाख उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महापालिकेने आज 4,02,408 उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण पार केला आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी तशी माहिती दिली. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्याटप्प्याने देण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, 45 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.
कुणाला किती डोस?
आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर 23,887 आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहिला तर 15,569 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांपैकी 26,376 लाभार्थ्यांना पहिला व 12,950 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 ते 60 वयोगटातंर्गत लाभार्थ्यांना 1,15,056 पहिला तर 22,262 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षावरील नागरिकांमध्ये 1,19,338 लाभार्थ्यांना पहिला डोस व 50, 659 लाभार्थ्यांना दुसरा डोस तसेच 18 वर्षावरील नागरिकांमध्ये 15,331 लाभार्थ्यांना पहिला डोस व लाभार्थ्यांना 940 दुसरा डोस देण्यात आला आहे. (no vaccination in thane due to heavy rain lashes)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 9 June 2021 https://t.co/0sE3igQFAY #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2021
संबंधित बातम्या:
ठाण्यातील आपत्कालीन कक्षातील वायरलेस, दूरध्वनी सेवा सुरू आहे का?; एकनाथ शिंदेंनी केली खातरजमा
(no vaccination in thane due to heavy rain lashes)