No water in Nashik| नाशिककरांना आज निर्जळी; कोणत्या भागात येणार नाही पाणी, घ्या जाणून…!

नाशिकरोडच्या ज्या भागात आज पाणी येणार नाही, तिथे गुरुवारी पाणीपुरवठा होईल. मात्र, हा पाणीपुरवठाही कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.

No water in Nashik| नाशिककरांना आज निर्जळी; कोणत्या भागात येणार नाही पाणी, घ्या जाणून...!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 6:35 AM

नाशिकः नाशिककरांना आज बुधवारी अनेक भागात निर्जळीला सामोरे जावे लागणार आहे. कारण गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथून नाशिकरोडमधील पाण्याची टाकी भरणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीसाठी नाशिकरोडच्या काही भागात सकाळी आणि संध्याकाळी दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना बुधवारी पाणीपुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. येथे गुरुवारी पाणीपुरवठा होईल. मात्र, तोही कमी दाबाने असेल. त्यामुळे शुक्रवारपासून येथील पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.

प्रभाग क्रमांक 17

नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक सतरामधील तिरुपतीनगर, टाकळीरोड परिसर, कॅनोल रोड परिसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसा, दसकगाव, शिवाजीनगर, एसएससीबी कॉलनी या भागात पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक 18, 19

नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक 18 मधील भगवा चौक, शिवशक्तीनगर, पंचक गाव, सायखेडारोड, पवारवाडी, इंगळे चौक, अयोध्या कॉलनी, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी या भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर प्रभाग क्रमांक एकोणीसमधील गोरेवाडी भागात पाणी येणार नाही, असे कळवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी उद्या मंगळवारी पाणी व्यवस्थित भरून ठेवले, तर त्यांना अडचण येणार नाही.

प्रभाग क्रमांक 20, 21

नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक वीसच्या पुनारोड परिसर, डावखरवाडी, जयभवानी रोड परिसर, अश्विनी कॉलनी, जेतवनगर, बिटको कॉलेज तरणतलाव या भागात पाणीपुरवठा होणार नाही. नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक एकवीसमधील जयभवानी रोड परिसर, सहाणे मळा, लवटेनगर एक आणि दोन, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदिर रोड, धोंगडेनगर, जगतपा मळा, तरणतलाव परिसर, चव्हाण मळा, फर्नांडिस वाडी, भालेराव मळा, जाचकनगर, नंदनवन कॉलनी, आवटेनगर या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

प्रभाग क्रमांक 22

नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक बावीसमधील रोकडोबावाडी, डोबी मळा, सुंदरनगर या भागात पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा सुरू राहणार नाही, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. या भागात गुरुवारी पाणीपुरवठा होईल. मात्र, हा पाणीपुरवठाही कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.

इतर बातम्याः

Special News| बळीच्या राज्यात मजुरांचा ‘बळी’, गावाबाहेर गेल्यास बहिष्कृत करणार; नाशिकमधल्या तळवाडे ग्रामपंचायतीचा अजब फतवा

Chhatrapati| कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बांगड्या भेट; नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव समितीतर्फे शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

Health University Admission| आरोग्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू; कसा कराल अर्ज, जाणून घ्या माहिती…!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.