उत्तर नागपूर मतदारसंघाचा इतिहास आणि राजकीय स्थिती
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून इच्छूक उमेदवार अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन करत आहेत. महाराष्ट्रातील अशीच एक उत्तर नागपूर मतदारसंघात चुरशीची लढाई पाहायला मिळते. काँग्रेसकडून पुन्हा एकदा नितीन राऊत रिंगणात आहेत. आता त्यांच्या विरोधात भाजप कोणाला मैदानात उतरवते हे पाहावे लागेल.
उपराजधानी नागपुरातील उत्तर नागपूर मतदारसंघ हा झोपडपट्ट्यांसाठी अधिक प्रसिद्ध आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसने डॉ. नितीन राऊत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. भाजपकडून संदीप जाधव, डॉ. मिलिंद माने आणि अविनाश धमगाये हे इच्छूक आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेसला संयुक्त रिपाइं, वंचित आणि बसपच्या उमेवाराकडून मत विभाजनाचा मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. उत्तर नागपूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघावर कॉंग्रेस, भाजप आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकनेही सत्ता मिळवली आहे. १९७२ मध्ये नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून १ हजार ८५८ मतांनी फॉरवर्ड ब्लॉकचे दौलतराव हुसनजी गणवीर हे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे गणपत भगत यांना पराभूत केले होते. १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या (खोब्रागडे) गटाने विजय मिळवला होता. परंतु १९९० नंतर रिपाइं (खो) ची ताकद येथे कमी होत गेली.
१९७२ पासून येथे झोपडपट्ट्यांचे प्रश्न अजूनही कायम आहे. सध्या कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत हे या मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. १९९५ साली भाजपचे भोला बढेल या मतदारसंघातून विजयी झाले होते तर १९९९ साली कॉंग्रेसचे नितीन राऊत यांनी विजय मिळवला. २००४ आणि २००९ मध्ये देखील ते विजयी राहिले. मात्र २०१४ मध्ये डॉ. मिलिंद माने यांनी राऊत यांचा पराभव केला. परत २०१९ मध्ये नितीन राऊत विजयी झाले आणि आता पुन्हा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या १४ टक्के आहे. त्यानंतर मेशराम २.८ टक्के, पाटील १.३ टक्के, शाहू १.२ टक्के, गजबिये आणि रामटेके मतदारांची संख्या अधिक आहे. येथे पुरुष मतदारांची संख्या १,७४,३४२, महिला मतदारांची संख्या १,६३,७६९ असे एकूण मतदार ३,३८,१२० आहेत.
२०१९ चा निकाल
उमेदवार | पक्ष | मतदान |
डॉ. नितीन राऊत | काँग्रेस | 86,821 |
डॉ. मिलिंद माने | भाजपा | 66,127 |
सुरेश भगवान सखरे | बसपा | 23,333 |
डोंगरे किर्ती दीपक | एआईएमआईएम | 9,318 |
१०१४ चा निकाल
उमेदवार | पक्ष | मतदान |
डॉ. मिलिंद माने | भाजपा | 68,905 |
किशोर उत्तमराव गजभिये | बसपा | 55,187 |
डॉ. नितीन राऊत | काँग्रेस | 50,042 |
२००९ चा निकाल
उमेदवार | पक्ष | मतदान |
डॉ. नितीन राऊत | काँग्रेस | 57,929 |
तांबे राजेश | भाजपा | 40,067 |
डॉ. मिलिंद माने | अपक्ष | 23,662 |
धरोंपल उर्फ धर्मकुमार देव पाटील | बसपा57,929 | 13,447 |