100 टक्के लसीकरणासाठी 30 नोव्हेंबरची डेडलाईन; नाशिक विभागातल्या मोहिमेला पुन्हा गती!
येत्या काळात सारा गाडा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा लसीकरणाला गती द्या, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही केले आहे. त्यादृष्टीने नाशिक विभागात पुन्हा एकदा लसीकरणाला गती देण्यात येत आहे.
नाशिकः येत्या 30 नोव्हेंबर 100 टक्के कोरोना लसीकरण करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात विक्रमी लसीकरण करणाऱ्या नाशिक विभागात येत्या काळात या मोहिमेची गती अजून वाढणार आहे.
देशात 16 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देणे सुरू झाले. प्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर व नंतर 1 मे 2021 पासून सर्व 18 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी 22 ऑक्टोबर अखेर कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले होते. या दोन प्रकारच्या कोरोना लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 45 लाख 12 हजार 691 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 32 लाख 90 हजार 262 जणांनी पहिला डोस घेतला असून 12 लाख 22 हजार 429 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. नाशिक विभागात नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे येतात. त्यात अहमदनगर जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपर्यंत एकूण 32 लाख 52 हजार 514 जणांचे लसीकरण करण्यात आले असून, यामध्ये 24 लाख 10 हजार 016 जणांनी पहिला डोस घेतला असून 08 लाख 42 हजार 498 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 14 लाख 32 हजार 592 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 09 लाख 79 हजार 876 जणांनी पहिला डोस घेतला असून 04 लाख 52 हजार 716 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 27 लाख 09 हजार 094 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 20 लाख 36 हजार 779 जणांनी पहिला डोस घेतला असून 06 लाख 72 हजार 315 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 10 लाख 28 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 07 लाख 710 जणांनी पहिला डोस घेतला असून 03 लाख 27 हजार 292 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
काही तालुक्यात रुग्णवाढ
नाशिक विभागात लसीकरणाचे प्रमाण विक्रमी असूनही सिन्नर, निफाड आणि येवल्यामध्ये सातत्याने रुग्णवाढ होताना दिसत आहे. राज्य सरकराने खुले केलेले निर्बंध, दिवाळीच्या सणात झालेली गर्दी, लोकांनी कोरोना नियम बासनात गुंडाळून ठेवलेले आणि तिसऱ्या लाटेची भीती हे पाहता पुन्हा एकदा लसीकरणाला गती देण्याची गरज व्यक्त होत आहे. खरे तर मुख्यंत्र्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधण्यापूर्वी हे आदेश दिले आहेत. मात्र, येत्या काळात सारा गाडा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा लसीकरणाला गती द्या, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही केले आहे. त्यादृष्टीने नाशिक विभागात पुन्हा एकदा लसीकरणाला गती देण्यात येत आहे. (November 30 deadline for 100 percent vaccination; Chief Minister’s order to Nashik Divisional Commissioner, District Collector)
इतर बातम्याः
महाराष्ट्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा; नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी
‘कवच कुंडल’ विरुद्ध ‘हर घर दस्तक’; कोणती लसीकरण मोहीम राबवायची, राज्यातले आरोग्य कर्मचारी पेचात!
Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!https://t.co/rIFR65qDOq#SpecialReport|#PabloNeruda|#Poet|#RevolutionaryPoet|#Chile
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021