एकाही अहवालात मराठा समाजाला मागास म्हटले नाही… बबनराव तायवाडे यांचा मनोज जरांगे यांच्यावर हल्ला

OBC Elgar chhagan bhujbal | आम्ही ४०० जातींचे ६० टक्के लोक आहोत. त्यामुळे आमचा अपमान सहन करणार नाही. कुणबी असल्याच्या ज्या 32 लाख नोंदी सापडल्याचा दावा केला जात आहे, त्या नोंदी व्यवस्थित तपासल्या तर पंधरा लाखांच्यावर येणार नाही. यामुळे त्यांच्या भुलथापांना कोणी बळी पडू नका.

एकाही अहवालात मराठा समाजाला मागास म्हटले नाही... बबनराव तायवाडे यांचा मनोज जरांगे यांच्यावर हल्ला
बबनराव तायवाडे
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 2:45 PM

हिंगोली, दि. 26 नोव्हेंबर 2023 | आमची लायकी काढली जात आहे. आमची लायकी काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आमची लायकी नाही असे म्हणतात तर आमच्या पंगती का येत आहे? असा प्रश्न राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना केला. हिंगोलीतील ओबीसी एल्गार परिषदेतून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला केला. तसेच आमची लायकी काढण्याचा यापुढे प्रयत्न केल्यास तुमचे महाराष्ट्रात फिरणे बंद करु, असा इशारा दिला.  1967 पासून आजपर्यंत कुठेच मराठा समाजास मागास म्हटले गेले नाही. सर्वच अहवालात मराठा समाजाला प्रगत समाज म्हटले होते. तेच छगन भुजबळ आता सांगत आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्यावर खोटे आरोप लावत आहात, असा हल्ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केला.

सर्वच अहवालांनी मराठा समाजास प्रगत दाखवले

मंडल आयोगाने मराठा समाजास सुपरकास्ट म्हटले आहे.  मराठा समाजासंदर्भात १९९४ पासून आतापर्यंत सात आयोग नेमले गेले आहे. परंतु एकाही आयोगाने मराठा समाजास मागास म्हटले नाही. त्यानंतर हे आमच्यावर कसे आरोप लावू शकतात? असा प्रश्न बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केला.

मनोज जरांगे यांचा धिक्कार करतो

आमचे नेते तुमच्याविषयी एखादा शब्द बोलत असतील तर त्यांना शिवीगाळ केली जाते. आमची लायकी काढली जाते. तुम्हाला हा अधिकार कोणी दिला. यामुळे आम्ही मनोज जरांगे यांचा धिक्कार करतो. त्यांचा निषेध करतो. यापुढे ओबीसीच्या विरोधात जर कोणी बोलण्याची हिंमत करु नका, असा इशारा त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

त्या नोंदी १५ लाखांपेक्षा जास्त नसतील

मनोज जरांगे म्हणाले महाराष्ट्रात 32 लाख कुणबी नोंदी सापडल्या. 32 लाख गुणीला 100 म्हणजे तेवढे नवीन मराठा या ओबीसीमध्ये आले. परंतु तुम्ही किती मूर्ख बनवत आहात. ज्या 32 लाख नोंदी सापडल्या त्या व्यवस्थित तपासल्या तर पंधरा लाखांच्या वर येणार नाही. यामुळे त्यांच्या भुलथापांना कोणी बळी पडू नका. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचे रक्षण करणार म्हणजे करणार आहोत. आपल्या सर्वांना हिम्मत देण्यासाठी या ठिकाणी सर्व विचारांचे लोक एकत्र आलेले आहेत. भुजबळ साहेब एकटे नाही. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत, असे बनराव तायवाडे यांनी म्हटले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.