ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन

नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यावर जालन्यातील वीरा हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. दोन्ही नेत्यांनी सलग 9 दिवस उपोषण केल्यानंतर आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. असं असताना या दोन्ही नेत्यांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती मिळत आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 7:10 PM

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणासाठी नुकतंच आंदोलन केलं. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावं, असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मराठा हेच कुणबी आहेत, असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. पण मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र दिलं तर त्याचा ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होईल, असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देवू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सलग 9 दिवस उपोषण केलं. त्यांच्या उपोषणामुळे सरकारवर दबाव वाढला. त्यामुळे ओबीसी नेत्यांची राज्य सरकारसोबत बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही, असं आश्वासन राज्य सरकारने दिलं. या सर्व घडामोडींनंतर आता लक्ष्मण वाघामारे आणि नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन येत असल्याचं त्यांनी म्हंटलय. नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यावर जालन्यातील वीरा हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान नवनाथ वाघमारे यांच्या फोनवरती अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचा आरोप वाघमारे यांनी केलाय. या धमकीच्या फोननंतर आज वडीगोद्रीतील ग्रामस्थांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

‘कोणत्याही धमकीला भीक घालत नाही’, लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया

वडीगोद्रीच्या ग्रामस्थांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघामारे यांच्या सुरक्षेची मागणी केली. दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी आपण कोणत्याही धमकीला भीक घालत नसल्याचं म्हटलं आहे. यापूर्वी आपल्याला अनेक वेळा धमकीचे फोन आले. आंदोलनादरम्यान आपण फोन उचलले नाहीत. मात्र आपण कोणाला घाबरत नाही, असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं. पोलीस आता धमकी करणाऱ्याला शोधून काढतात का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.