‘धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे सर्व ओबीसी समाज’, प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य

"छगन भुजबळ यांचं अजून पुनर्वसन झालं नाही आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट करायला लागले आहेत. एक-एक ओबीसी नेत्याला आता टार्गेट करायला सुरूवात झाली तर आम्ही शांत बसू शकत नाहीत", असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.

'धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे सर्व ओबीसी समाज', प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य
धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे सर्व ओबीसी समाज, प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 10:11 PM

ओबीसी नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “धनंजय मुंडे यांचा बीड सरपंच हत्या प्रकरणात काहीच संबंध नसताना त्यांचं नाव आलं. हा सगळा मीडिया ट्रायल चालू आहे. बीड जिल्ह्यातले सगळे मराठा समाजाचे नेते त्यांना टार्गेट करत आहेत. धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे सर्व ओबीसी समाज ठामपणे उभा आहे. आम्ही आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो आणि त्यांना सुद्धा सांगितले विनाकारण अशा प्रकारचे राजकीय दबाव चुकीचे आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे, जो कोणी खुनी आहे त्याला माफी देता कामा नये. त्याला फाशीवर लटकवले पाहिजे”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

“आता असं काय झालं की गुन्हा राहिला बाजूला आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जातंय? माजी मंत्री छगन भुजबळ यांचं अजून पुनर्वसन झालं नाही आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट करायला लागले आहेत. एक-एक ओबीसी नेत्याला आता टार्गेट करायला सुरूवात झाली तर आम्ही शांत बसू शकत नाहीत”, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.

‘जरांगे घरात घुसून मारायची भाषा करायला लागले’

“मराठा नेते मनोज जरांगे पाटील आता घरात घुसून मारायची भाषा करायला लागले. यामुळे महाराष्ट्रातील सर्व ओबीसी कार्यकर्ते, नेते सगळे एकत्र होऊन पुन्हा एल्गार महामेळावा सुरू करावा लागेल. बीडमधले पुरावे पुण्यात येऊन सादर करत आहेत. हे काय चाललंय महाराष्ट्रात?”, असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे उभे आहोत. कुणालातरी मंत्री व्हायचे. तिथे कोणालातरी पालकमंत्री व्हायचंय म्हणून ओबीसींच्या मंत्र्यांना टार्गेट करायचं हे आम्हाला मान्य नाही. यासाठी भेट घेतली, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

प्रकाश शेंडगे अंजली दमानिया यांच्यावर टीका

प्रकाश शेंडगे यांनी यावेळी अंजली दमानिया यांच्यावरही टीका केली. “अंजली दमानियांचा काय सामाजिक चळवळींशी संबंध आहे? त्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे. कोण आहेत या अंजली दमानिया? त्यांचा काही संबंध नाही. आम्ही त्यांचा निषेध करतो. जातीपातीच्या राजकारणात त्यांनी पडू नये. त्यांची प्रतिमा चांगली होती. यामध्ये आम्ही त्यांना चांगलं समजत होतो. पण आता वंजाऱ्यांचे अधिकारी जास्त कसे काय? अंजली दमानिया यांना कोणी सुपारी दिली आहे की काय? या सुपारी बहाद्दर आहेत की काय अशी शंका आम्हाला यायला लागली आहे. त्यांनी हे ताबडतोब थांबवावं. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहोत”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.