खोक्या हरणाची शिकार करुन मटण सुरेश धस यांना पोहचवत होता…ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप
सुरेश धस सांगतात की खोक्या हा माझा कार्यकर्ता आहे. मग धसांनी त्याला हरणाची शिकार करु नको, असे का सांगितले नाही. हा संपूर्ण प्रकार सहानभूती मिळवण्यासाठी आहे. सुरेश धस हे सोंगाड्या आहेत. या सगळ्या टीमचा प्रमुख आहे, असे मुंडे यांनी म्हटले.

खोक्या ऊर्फ सतीश भोसले प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस अडचणीत आले आहे. खोक्या भोसलेच्या हरणाच्या शिकार प्रकरणात सुरेश धस यांचे नाव घेतले गेले आहे. खोक्या हरणाचे मटण सुरेश धस यांनाही पोहचवत होता, असे गंभीर आरोप ओबीसी नेते टी.पी. मुंडे यांनी केले आहेत. टी.पी.मुंडे म्हणाले, खोक्या हरणाची शिकार करत होता. त्यानंतर त्याचे मास सुरेश धस यांना देत होता. या भागातील लोक हा प्रकार सांगतात.
टी.पी.मुंडे म्हणाले, जेव्हा मी त्या कुटुंबाला भेटायला गेलो होतो. त्यावेळी मला त्या कुटुंबांनी सांगितले की खोक्या हरणाची शिकार करत होता. त्याला आम्ही सांगितले की हरणाची शिकार करू नको तर त्यांनी आम्हाला मारहाण केली. खोक्याला सुरेश धस यांचे समर्थन आहे. त्या ठिकाणी दहा-बारा गावचे सरपंच जमा झाले होते ते पण सांगत होते. खोक्या सावकार हा नेहमी शिरूर तालुक्यात लोकांवर दमदाटी करत असतो. त्यासाठी खोक्याची पंधरा वीस जणांची टीम आहे, असे टी.पी.मुंडे यांनी सांगितले.
सुरेश धस सांगतात की खोक्या हा माझा कार्यकर्ता आहे. मग धसांनी त्याला हरणाची शिकार करु नको, असे का सांगितले नाही. हा संपूर्ण प्रकार सहानभूती मिळवण्यासाठी आहे. सुरेश धस हे सोंगाड्या आहेत. या सगळ्या टीमचा प्रमुख आहे, असे मुंडे यांनी म्हटले. सुरेश धस यांच्या आरोपावर म्हणाले, मुंडे म्हणजे काय परळीतले सगळे गुंडे आहेत का? तुमच्या खानदानामध्ये पूर्वीपासूनच गुंडगिरी मोठ्या प्रमाणात चालत होती ls आम्ही तुम्हाला म्हणावे का? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.




टी.पी. मुंडे म्हणाले, सुरेश धस यांनी असे खोटे बोलू नये ते काय आमचे दुश्मन नाहीत. परळीला आले की ते नेहमी माझ्याकडे येत होते. आमच्या समाजाच्या माणसावर अन्याय झाला. त्याला मारहाण करण्यात आली. यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. वन खात्याचा अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याचे घर पाडले त्या ठिकाणी हरणाला मारणारे वाघोरी सापडल्या. हरणाला मारायचे फासे सापडले. त्या ठिकाणी हरणाचे मास सापडले. ते तपासणीसाठी पाठवला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावे. आम्हीही मुख्यमंत्र्यांना भेटू. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. ‘दूध का दूध पाणी का पाणी’ बाहेर पडेल, अशी आम्ही मागणी करत आहोत.