Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनवरुन आरबीआय दिले सडतोड उत्तर

old pension scheme | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप सुरु केली आहे. या संपात सर्व राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होणार आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे. परंतु यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेने जुनी पेन्शन योजनासंदर्भात राज्यांना इशारा दिला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनवरुन आरबीआय दिले सडतोड उत्तर
old pension scheme
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 8:40 AM

मुंबई, 14 डिसेंबर | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा आणि कंत्राटीकरण बंद करा, ही मागणी कर्मचाऱ्यांची आहे. या संपात सर्व राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होणार आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे. राज्य सरकार आज विधिमंडळात यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गंभीर इशारा दिला आहे. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास विकासकामांसाठी पैसेच राहणार नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

काय म्हटले आरबीआयने

निवडणुकी दरम्यान अनेक राजकीय पक्ष जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन देत आहे. काही राज्यांनी ही पेन्शन योजना लागू केली आहे. परंतु या प्रकरणात आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. आरबीआयने राज्यांना इशारा दिला आहे. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास खर्च अनेक पटींनी वाढणार आहे. यामुळे विकासकामांना पैसा पुरणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.

४.५ पटीने राज्यावर बोजा वाढणार

जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्यांचा बोजा ४.५ पटींने वाढणार आहे. देशाच्या विकास दरावर त्याचा परिणाम होणार आहे. २०६० पर्यंत याचा बोजा ०.९ टक्के जाईल. यामुळे सरकारला विकास कामे करण्यासाठी निधी उरलणार नाही. आरबीआयने “स्टडी ऑफ बजेट्स ऑफ २०२३-२४” हा अहवाल दिला आहे. त्यात हा इशारा दिला आहे. तसेच अहवालात काही सल्लेही दिले आहे.

हे सुद्धा वाचा

काय दिले सल्ले

सर्व राज्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. कर चोरी रोखण्यासोबत अवैध उत्खनन रोखण्यावर आणि कर संकलन वाढवण्यावर भर द्यावा. उत्पादन शुल्क, मालमत्ता कर, मुद्रांक नोंदणी शुल्क, वाहन कर यासंदर्भात फेरविचार करण्याचा सल्ला भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यांना दिला आहे. यामुळे एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी दुसरीकडे आरबीआयचा इशारा अशा दुहेरी कचाट्यात राज्य सरकार अडकले आहे. महाराष्ट्र सरकार जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही, परंतु २००५ मध्ये सुरु केलेल्या पेन्शन योजनेत सुधारणा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...