उमरग्याचे ठाकरेंचे आमदार प्रवीण स्वामी यांची आमदारकी धोक्यात? नेमकं प्रकरण काय?

उमरगा विधानसभेचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जातीच्या प्रमाणपत्राविरोधात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत प्रवीण स्वामींचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात या प्रकरणाची फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

उमरग्याचे ठाकरेंचे आमदार प्रवीण स्वामी यांची आमदारकी धोक्यात? नेमकं प्रकरण काय?
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 10:25 PM

उमरग्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांची आमदारकी धोक्यात आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्या विरोधात जात वैधता प्रमाणपत्रावर याचिका दाखल केली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. विधानसभेच्या निवडणूकीतील पराभूत उमेदवार माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या याचिकेसह प्रवीण स्वामी यांच्याविरुद्ध इलेक्शन पिटीशनही दाखल केली आहे. चौगुले यांनी निवडणुकीचे निर्णय आणि तांत्रिक बाबींवर 16 2025 या क्रमांकाची इलेक्शन पिटीशन दाखल केली आहे.

याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांना संभाजीनगर उच्च न्यायालयाकडून नोटीस देण्यात आली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने या ठिकाणी प्रवीण स्वामी यांना संधी मिळाली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला होता.

हे सुद्धा वाचा

अटीतटीच्या लढतीत प्रवीण स्वामी विजयी

उमरगा विधानसभा मतदारसंघाची 2024 निवडणूक अतिशय अटीतटीची ठरली. अटीतटीच्या या लढतीत हे प्रवीण स्वामी 94550 मते घेऊन विजयी झाले. तर ज्ञानराज चौगुले यांना 91142 मतांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे चौगुले या मतदारसंघात सलग तीन वेळा जिंकून आले होते. असं असताना त्यांना धूळ चारण्यात प्रवीण स्वामी यशस्वी झाले. पण आता चौगुले यांनी त्यांच्या आमदारकीवर आक्षेप घेतल्याने या प्रकरणाकडे आता राज्याचं लक्ष केंद्रीत होणार आहे. आगामी काळात या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...