Omicron : ओमिक्रॉनचे 8 रुग्ण आढळल्याने राज्याचे धाबे दणाणले, दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांशी बैठक
झपाट्याने ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने राज्याच्या टास्क फोर्सची दक्षिण आक्रिकेतील तज्ज्ञांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे.
मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्यानं वाढत असल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारची चिंताही वाढली आहे. राज्यात बघता बघता ओमिक्रॉनच्या रुग्णांची सख्या 8 वर गेली आहे. त्यामुळे प्रसासनाच्या वतीने काय खबरदारी घेता येईल? काय उपाययोजना करता येतील? यासाठी धावपळ सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनचा राज्यातला पहिला रुग्ण आढळून आला, त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.
राज्याच्या टास्क फोर्सची दक्षिण आक्रिकेतील तज्ज्ञांसोबत बैठक
झपाट्याने ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने राज्याच्या टास्क फोर्सची दक्षिण आक्रिकेतील तज्ज्ञांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात एवढी मोठी रुग्णवाढ झाल्याने देशाची चिंताही वाढली आहे. त्यामुळे देशपातळीवरही काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातही निर्बंध आणखी कडक केले जाण्याची शक्यता आहे.
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचा स्फोट
पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागात झालेली ओमिक्रॉन रुग्णांची संख्या स्फोटक आहे. एकाच दिवसात तब्बल 8 नवे रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून कामाला लागले आहे. तर पुण्यात एक ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पुणे विभागाची चिंताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांनाही सौम्य लक्षणे आहेत, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्यानं थोडासा प्राथमिक दिलासा मिळाला आहे. मात्र लस घेतलेल्या रुग्णांनाही ओमिक्रॉन होत असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.