Omicron Variant : हायरिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर वेगळा कॉरिडॉर

हायरिस्क देशातून आलेली सर्व विमाने टर्मिनलच्या पूर्वेला उतरवण्यात येतील. प्रवाशाने विमानतळावर प्रवेश करताच थर्मल स्कॅनरमधून तापमान मोजले जाईल. त्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी 100 रजिस्ट्रेशन काऊंटर तयार करण्यात आले आहेत. प्रवाशांना कोरोना चाचणीसाठी ताटकळत राहावे लागू नये म्हणून 68 सॅम्पल कलेक्शन बुथ तयार करण्यात आले आहेत.

Omicron Variant : हायरिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर वेगळा कॉरिडॉर
मुंबई विमानतळ
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 7:33 PM

मुंबई : कोरोना विषाणूचा नवा प्रकार (Corona New Variant) असलेल्या ओमिक्रॉननं (Omicron) राज्यात शिरकाव केलाय. डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आता मुंबईतही ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग (Health Department) आणि संबंधित यंत्रणांकडून मोठी खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांना आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या लोकांना ओमिक्रॉनची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हायरिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर वेगळा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे.

हायरिस्क देशातून आलेली सर्व विमाने टर्मिनलच्या पूर्वेला उतरवण्यात येतील. प्रवाशाने विमानतळावर प्रवेश करताच थर्मल स्कॅनरमधून तापमान मोजले जाईल. त्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी 100 रजिस्ट्रेशन काऊंटर तयार करण्यात आले आहेत. प्रवाशांना कोरोना चाचणीसाठी ताटकळत राहावे लागू नये म्हणून 68 सॅम्पल कलेक्शन बुथ तयार करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर आणि रॅपीड पीसीआर हे दोन पर्याय प्रवाशांकडे असतील. सॅम्पल कलेक्शननंतर प्रवाशी इमिग्रेशन प्रक्रिया पार पाडू शकतो. दरम्यान, प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास त्याला 14 दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. तर रिपोर्ट निगेटीव्ह आल्यास 7 दिवस होम कॉरंटाईन केले जाईल. 7 दिवसानंतर या प्रवाशाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.

मुंबईतील दोघांना ओमिक्रॉनची लागण

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गवरुन 25 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे सिध्द झाले आहे. या रुग्णासोबत राहिलेल्या आणि 25 नोव्हेंबरला अमेरिकेहून आलेल्या त्याच्या 36 वर्षीय मैत्रिणीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत. हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या 5 अतिजोखमीच्या आणि 15 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेकडून कोणती खबरदारी घेण्यात येणार ?

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी कोरोनाच्या नव्या रुपाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती दिलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार आहे. या प्रवाशांचे कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण करण्यात येणार नाही. दुर्दैवाने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आलाच तर त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रामध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येतील.

इतर बातम्या :

शिवसेना यूपीएत असणार का? पुढील 24 तासांत सांगणार, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून, 28 डिसेंबरला मुंबईत अंकिताचा विवाहसोहळा

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....