ओमिक्रॉनचा विस्फोट! दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 87 नवे रुग्ण, तर राज्यात 3900 नव्या कोरोना रुग्णांची भर

सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. मुंबई ओमिक्रॉनचे 34 रुग्ण आढळून आलेत.

ओमिक्रॉनचा विस्फोट! दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 87 नवे रुग्ण, तर राज्यात 3900 नव्या कोरोना रुग्णांची भर
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 9:31 PM

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा विस्फोट झाला असून एकाच दिवसात आढळले तब्बल 87 रुग्ण आढळले आहेत. 43 प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय प्रवास तर त्यांच्या सहवासातून 4 जणांना बाधा झाली आहे. 37 जणांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नसून त्यांनाही लागण झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहे. मुंबई ओमिक्रॉनचे 34 रुग्ण आढळून आलेत. तर महाराष्ट्रात एकूण तब्बल 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जवळपास चार हजाराच्या जवळपास हा आकडा पोहोचल्यानं सगळेच धास्तावले आहेत. कोरोना विषाणी पुन्हा गुणाकार करु लागल्यानं आता वेळीच धोका ओळखून अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.

काय आहे आजची आकडेवारी?

  1. महाराष्ट्रातील आजचे नवे रुग्ण – 3900
  2. आज किती मृत्यू – 20
  3. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 97.61%
  4. किती रुग्ण आज बरे झाले – 1306
  5. होम क्वारंटाईनमध्ये किती – 122906
  6. ओमिक्रॉनचे किती नवे रुग्ण – 85

ओमिक्रॉनचे कुठे किती रुग्ण?

  1. मुंबई – 3
  2. नागपूर आणि पिंपरी चिंचवड- प्रत्येकी 3
  3. नवी मुंबई आणि पुणे मनपा – प्रत्येकी 2
  4. पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणा – प्रत्येकी

एकट्या मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद

दरम्यान, मुंबईत आज आढळून आलेल्या नव्या कोरोना रुग्णांनी पुन्हा धडकी भरवली आहे. कारण मुंबईत कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ झाली आहे, एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तम नियोजन आणि कोरोनाला रोखणारा मुंबई पॅटर्न जगभर गाजला मात्रा आता त्याच मुंबईला पुन्हा धडकी भरली आहे, कारण मुंबईसह राज्यावर, देशावर तिसऱ्या लाटेची टांगली तलवार आहे.

नियम अधिक कडक

या स्फोटक रुग्णवाढीनंतर मुंबई महापालिकाही अलर्ट मोडवर आली आहे, मुंबई महापालिकेडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यात हॉटेल व उपहारगृहांचे दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. महानगरपालिका आणि पोलीस प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक लक्ष ठेवणार आहे. संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना आगमन प्रसंगी आरटीपीसीआर चाचणी आणि 7 दिवसाचे क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे.

इतर बातम्या –

Mumbai | आता खैर नाही! नियम मोडणाऱ्यांवर कशी करणार कारवाई? BMCनं तयार केला ऍक्शनप्लॅन

Corona Update: मुंबईत पार्ट्यांवर बंदी, तर इमारतीही सील, आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय करायचं, काय नको!

Omicron संसर्गाच्या वाढत्या वेगानं धडकी, दिल्लीनं महाराष्ट्राला मागं टाकलं, देशाची रुग्णसंख्या 781 वर

पाहा व्हिडीओ –

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.