Omicron| मोठा दिलासा, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग नाही; बूस्टर डोसबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय

देशातल्या 17 राज्यांमध्ये ओमिक्रॉन संक्रमित झाल्यामुळे आज केंद्र सरकारने महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

Omicron| मोठा दिलासा, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग नाही; बूस्टर डोसबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 11:00 AM

मुंबईः राज्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या कोरोना विषाणूचा समूह संसर्ग अजून तरी झालेला नसल्याचे उघड झाले आहे. जिनोमिक सिक्वेंसिंगच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यातील सर्व वयोगटातील करोना बाधितांचे घेतलेले नमुने दिल्लीला पाठवण्यात आले होते. आता त्याचा अहवाल समोर आला आहे.

अजून डेल्टाचाच समूह

जिनोमिक सिक्वेंसिंगच्या अहवालात म्हटले आहे की, राज्यात अजून तरी ओमिक्रॉनचा समूह संसर्ग झालेला नाही. आजपर्यंत केलेल्या सर्वेक्षणावरून राज्यात डेल्टाचाच समूह संसर्ग असल्याचे पुढे आले आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजकडे देण्यात राज्य समन्वयाची जबाबदारी आहे. त्यानुसार राज्यातील सर्व वयोगटातील कोरोनाबाधितांच्या घेतलेले नमुने दिल्लीला पाठवण्यात आले होते. त्यातूनच ही माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक अँण्ड इंटीग्रेटीव्ह बायोलॉजी या संस्थेसोबत जीनोम सिक्वेंसिगंच्या अहवाल देण्याबाबत करार केला आहे. आता या इन्स्टिट्यूटने दिलेल्या अहवालात राज्यात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

दिल्लीत आज बैठक

देशातल्या 17 राज्यांमध्ये ओमिक्रॉन संक्रमित झाल्यामुळे आज केंद्र सरकारने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र आणि नवी दिल्लीत सर्वात जास्त ओमीक्रॉनचे रुग्ण सापडले असून, देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ही 236 वर पोहोचली आहे. दरम्यान दिल्ली सरकारने नववर्षांच्या पार्टी आणि सेलिब्रेशन वर बंदी घातली असून, अरविंद केजरीवाल यांनीही आज एक बैठक बोलावली आहे.

बूस्टर डोसवरही चर्चा

देशात ओमिक्रॉन धोका वाढत असतानाच बूस्टर डोसबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या लसींचा ओमिक्रॉनवर कितपत परिणाम होतोय, याबाबतचा अभ्यास सुरू असून भारतीयांना बुस्टर डोस द्यायचा की नाही याचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेतला जाणार आहे.

ब्रिटन लॉकडाऊनकडे

ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचा कहर दिसून आलाय. 1 लाख 47 हजार कोरोनाचे नवे रुग्ण ब्रिटनमध्ये आढळून आलेत.त्यामुळं ब्रिटन सरकारची चिंता वाढली आहे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आज एक तातडीची बैठक बोलावली असून ब्रिटनमध्ये लॉकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्याः

Saamana| भाजपने अयोध्येस चोरांची आळंदी केली, ‘सामना’तून धुलाई; ईडी, सीबीआयला तिथेच कायमस्वरूपी कार्यालय उघडायचा सल्ला

VIDEO: मुख्यमंत्री दोन दिवसात सभागृहात येतीलही, पंतप्रधान तंदुरुस्त, संसदेत का येत नाहीत?; संजय राऊतांचा सवाल

Shakti Act: महिला अत्याचाराविरुद्ध शक्ती कायदा हिवाळी अधिवेशनातच मंजूर होणार, काय आहेत महत्त्वाच्या तरतुदी?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.