मराठवाड्यात पहिल्याच दिवशी विधानसभा निवडणूक अर्जाला मोठा प्रतिसाद, कोणी-कोणी घेतला फॉर्म?

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

मराठवाड्यात पहिल्याच दिवशी विधानसभा निवडणूक अर्जाला मोठा प्रतिसाद, कोणी-कोणी घेतला फॉर्म?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 8:06 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर चार नोव्हेबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. वीस नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी अनेक इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात आज खालील प्रमाणे उमेदवारी अर्जाचं वितरण करण्यात आलं.  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार मतदारसंघनिहाय माहिती

१. १०४-सिल्लोड- 22 जणांनी 57 अर्ज २. १०५-कन्नड- 35 जणांनी 84 अर्ज ३. १०६- फुलंब्री- 26 जणांनी 60 अर्ज ४. १०७-औरंगाबाद (मध्य)-31 जणांनी 67 अर्ज ५. १०८-औरंगाबाद (पश्चिम)-28 जणांनी 57 अर्ज ६. १०९-औरंगाबाद(पूर्व)- 53 जणांनी 110 अर्ज ७. ११०- पैठण- 30 जणांनी 60 अर्ज ८. १११-गंगापूर-33 जणांनी 73 अर्ज ; १ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल ९. ११२-वैजापूर-10 जणांनी 19 अर्ज.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याप्रमाणेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील आज पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्जाचं वितरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं पाहायला मिळालं आज 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 324 नामनिर्देशन पत्राचे वाटप उमेदवारांना करण्यात आले आहे. तर 3 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.

134 भिवंडी विधानसभा मतदारसंघ – 7 अर्ज, 135 – शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघ – 9 अर्ज, 136 – भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – 35 अर्ज, 137 – भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ – 29 अर्ज, 138 – कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ – 32 अर्ज, 139 – मुरबाड विधानसभा मतदारसंघ – 22 अर्ज, 140 – अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ – 9 अर्ज, 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ – 2 अर्ज, 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ – 21 अर्ज, 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – 4 अर्ज, 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – 6 अर्ज, 145 मिराभाईंदर विधानसभा मतदारसंघ – 38 अर्ज 146 – ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ – 19, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ – 20, 148 – ठाणे विधानसभा मतदारसंघ – 19 , 149 – कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघ – 10, 150 – ऐरोली विधानसभा मतदारसंघ – 11, 151 – बेलापूर विधानसभा मतदारसंघ – 31 असे एकूण 324 अर्जाचे वाटप करण्यात आले.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.