एक कपडा एक करंजी, हा उपक्रम कुणी आणि का सुरू केला

शहरातील सिग्नलवर, उड्डाण पुलाच्या खाली, रस्त्याच्या कडेला उघड्यावर संसार थाटलेले अनेक जणांची दिवाळी गोड करण्यात येत आहे.

एक कपडा एक करंजी, हा उपक्रम कुणी आणि का सुरू केला
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 1:49 PM

Nashik News : गोरगरिब आणि रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांमध्ये दिवाळी (Diwali Festival) साजरी होत नाही. अशा व्यक्तीना दुजाभाव वाटू नये याकरिता सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (NCP) “एक कपडा एक करंजी” हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये गरिबांना कपडे, महिलांना साड्या, फराळ आणि लहान मुलांना फटाक्यांचे वाटप करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी हा उपक्रम राबविला आहे. दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळीचा आनंद साजरा करतात. पण गोरगरिब तसेच रस्त्यालगत राहणाऱ्या कुटुंबाना यापासून वंचित राहावे लागते. गोरगरिबांना किमान कपडे आणि गोडधोड मिळावे त्यांना दुजाभाव वाटू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही एक कपडा एक करंजी उपक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हाती घेतला आहे.याच उपक्रमाची चर्चा होत असून गरिबांची दिवाळी गोड होत आहे.

यामध्ये गरजू व्यक्तींना कपडे, महिलांना साड्या, फराळ तसेच लहान मुलांना कपडे व फटाक्यांचे वाटप करण्यात आले.

सर्वसामान्य नागरिक दिवाळीला नवीन कपडे आवर्जून खरेदी करतो. तसेच प्रत्येक घरा-घरात दिवाळीत फराळ बनविण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

नवीन कपडे खरेदी केल्यावर अपोआप जुन्या कपड्यांकडे दुर्लक्ष होते. हे जुने कपडे गरजवंताला उपयोगी पडतात.

यामुळे अशा कुटुंबांकडून कपडे, फराळ व फटाके जमा करून गरजवंतापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शहरातील सिग्नलवर, उड्डाण पुलाच्या खाली, रस्त्याच्या कडेला उघड्यावर संसार थाटलेले अनेक जणांची दिवाळी गोड करण्यात नाशिक राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस पुढाकार घेत त्यांची दिवाळी गोड करत आहे.

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने सुरू केलेल्या या उपक्रमाची शहरात चर्चा होत असून गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठीचा पुढाकार यंदाही कायम ठेवल्याने कौतुक केले जात आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.