रेल्वे रुळाचं काम सुरु असताना टीआरटी मशीनचा अपघात, मजुराचा मृत्यू, मशीन चालकास अटक
अंबरनाथ-बदलापूर दरम्यान झालेल्या टीआरटी मशीन अपघात प्रकरणी टीआरटी मशीन ऑपरेटर सुनिल कुमारला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे (one labour death in TRT machine accident).
ठाणे : अंबरनाथ-बदलापूर दरम्यान झालेल्या टीआरटी मशीन अपघात प्रकरणी टीआरटी मशीन ऑपरेटर सुनिल कुमारला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी मशीन अपघातात एका मजूराचा मृत्यू तर दोन मजूर जखमी झाले होते (one labour death in TRT machine accident).
27 जानेवारीला पहाटे अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाखाली स्लीपर ब्लॉक कामासाठी रेल्वेने डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला होता. पहाटे तीन वाजेच्या सुमारास काम सुरु असता स्लीपर ब्लॉक टाकणारी मशीनला अपघात झाला. या अपघातादरम्यान 12 स्लीपरचा एक बंडल कामगारांच्या अंगावर पडला. राजू झुगारे नावाचा मजूर हा जागीच ठार झाला. तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. या दोघांवर शीव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे सहा तास डाऊन मार्गावर अंबरनाथ बदलापूर दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प होती. या प्रकरणात कल्याण जीआरपीने आकस्मीत मृत्यूचा गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. टीआरटी ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे एका गरीब मजूराचा मृत्यू झाला, असं तपासात हे निष्पन्न झाले आहे.
कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दूल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “या प्रकरणी टीआरटी मशीन ऑपरेटर सुनिल कुमार याला कल्याण जीआरपीने अटक केली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. सुनिलकुमार न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या गुन्हा जामीनपात्र असल्याने त्याला पुढे जामीन मिळू शकतो (one labour death in TRT machine accident).
हेही वाचा : गाडीवरुन चालताना धक्का लागला, बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत, तरुणाची धारदार शस्त्राने हत्या