‘आयटीआय’ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू; नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येथे करता येईल अर्ज!

राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील 2021 या सत्रातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

'आयटीआय'ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू; नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येथे करता येईल अर्ज!
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक.
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 5:19 PM

नाशिकः राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील 2021 या सत्रातील प्रवेश प्रक्रिया सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन प्रवेश न घेता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे, असे आवाहन नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील सर्व प्रवेश प्रक्रिया admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर होत आहे. शासनाची कोणतीही मान्यता अथवा पूर्व परवानगी नसलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबवित आहेत. त्याअनुषंगाने इच्छुक उमेवारांनी प्रवेश घेत असलेली सदर संस्था admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची खात्री करून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातूनच प्रवेश घ्यावे, अशा सूचनाही नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केली आहे. सदर प्रवेश प्रक्रियेबाबत उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज सादर केल्यास होणाऱ्या शैक्षणिक व आर्थिक नुकसाकरिता संबंधित उमेदवार जबाबदार राहील यांची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

राज्यात 417 शासकीय आयटीआय

सध्या राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान 01 शासकीय आयटीआय सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी 04 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र 02 संस्था व 43 शासकीय आयटीआमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी आश्रमशाळा आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात एकूण 549 खासगी आयटीआय आहेत.

संधीची अनेक दारे उघडी

युवकास आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करून सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजनाही अस्तित्वात आहे. शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण 11 हजार औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 1 लक्ष जागा स्थित करण्यात आलेल्या आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपेक्षा शिकाऊ उमेदवारीसाठी उपलब्ध जागा अधिक असल्याने प्रत्येक उत्तीर्ण उमेदवारास संधी उपलब्ध आहे.

इतर बातम्याः

लसीकरणाचा विक्रमः नाशिक विभाग राज्यात नंबर 1; एक कोटी पावणेपंधरा लाख डोस टुचुक!

गोदाकाठच्या 100 मीटर परिसरात नो प्लास्टिक झोन; नाशिक महापालिकेचा निर्णय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.