Mahad Building Collapse | अवघी 10 वर्षे जुनी इमारत, पत्त्याप्रमाणे कोसळली, नेमकं काय घडलं?

महाड शहरात काजलपुरा परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे (Mahad Building Collapse).

Mahad Building Collapse | अवघी 10 वर्षे जुनी इमारत, पत्त्याप्रमाणे कोसळली, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Aug 24, 2020 | 8:01 PM

रायगड :  महाड शहरात काजलपुरा परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या इमारतीचं नाव तारीक गार्डन असं होतं. ही दुर्घटना संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. या इमारतीत 47 फ्लॅट्स होते. जवळपास 70 ते 80 जण मलब्याखाली अडकल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर स्थानिकांकडून 200 ते 250 रहिवासी अडकल्याची भीती वर्तवली जात आहे (Mahad Building Collapse).

तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं, अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. इमारतीचा राडारोडा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी हा ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे (Mahad Building Collapse).

इमारत कोसळल्यामुळे मोठा ढिग निर्माण झाला आहे. हा ढिग बाजूला सारायला अडचणी येत आहेत. स्थानिकांनी तातडीने जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं. हा ढिगारा उपसायला जवळपास दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतरच खरी परिस्थिती कळेल.

तारीक गार्डन ही इमारत फक्त 10 वर्षे जुनी आहे. या इमारतीचं बांधकाम निकृष्ठ दर्जाचं होतं, असं स्थानिकांकडून स्पष्टपणे सांगितलं जात आहे. सध्या पोलीस, अग्नीशमन दलाचे जवान आणि बचाव पथक यांच्याकडून ढिगारा उपसायचे काम सुरु आहे. घटनास्थळी लाईटचीदेखील व्यवस्था करण्यात येत आहे, जेणेकरुन रात्रभर ढिगारा उपसायचे काम सुरु राहिल.

दरम्यान, या घटनेबाबत रायगड पोलिसांकडून या अधिकृत माहिती देण्यात आली आहे. “महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात 05 मजली इमारत आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पडली आहे. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. सुमारे 70 ते 80 रहिवाशी त्यामध्ये अडकल्याची शक्यता आहे. 15 लोकांना जखमी अवस्थेत बाहेर काढले असून त्यांना उपचारा करीत पाठविले आहे”, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मुख्य बातमी : महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, 200 ते 250 लोक अडकल्याची भीती

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.