AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे तर बेवड्यांना समर्पित सरकार, त्यांना शेतकरी नव्हे दारू उत्पादन करणारा जवळचा वाटतो- फडणवीसांचा घणाघात

उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे भाजप मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अधिवेशनात लावून धरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे तर बेवड्यांना समर्पित सरकार, त्यांना शेतकरी नव्हे दारू उत्पादन करणारा जवळचा वाटतो- फडणवीसांचा घणाघात
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 2:01 PM

मुंबईः उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिकावेशनात (Budget Session) विरोधी पक्षाच्या भूमिकेतून भाजप सत्ताधारी सरकारला पूर्णपणे घेरण्याच्या स्थितीत आहे. त्याचेच संकेत आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्रकार परिषदेतून मिळाले. राज्यातील ऊस गाळपाचा प्रश्न, वीजेचा प्रश्न, मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न सुटलेले नाहीत, तसेच राज्यातील भ्रष्टाचार चरम सीमेला पोहोचलाय, हे भ्रष्टाचारी सरकार आहे, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या वाईन धोरणावर टीका करताना, सरकारनं हा निर्णय शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतला नाही तर बेवड्यांसाठी घेतला आहे. हे बेवड्यांना समर्पित सरकार आहे, असा ठपका देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला.

काय म्हणाले फडणवीस?

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातले परिक्षांचे घोटाळे संपले नाहीत, भ्रष्टाचार चरम सिमेला पोहचलाय. हे आतापर्यंतचं सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार आहे. कारकून साहेबाला लाच मागतोय, तुम्हाला 15 लाख मिळाले, मला 2 लाख का नाही? असा सगळा पर्कार आहे. बंदुकीचा धाक दाखवल्याचेही प्रकार झाले आहेत. एकूणच सरकार पूर्णपणे फेल झालं, या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो, तो म्हणजेच दारु उत्पादन करणारा, बेवड्यांना समर्पित हे सरकार आहे, बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतलेले नाही. त्यामुळे सरकारचे काळे कामं बाहेर काढू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

‘नवाब मलिकांचा राजीनामा न घेणे दुर्दैवी’

नवाब मलिकांचा राजीनामा न घेऊन एका विशिष्ट समाजाला सिग्नल देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. संजय राठोडचा राजीनामा पटकन होतो, पण नवाब मलिकांनी देशद्रोह्यांसोबत व्यवहार केल्यानंतरही वाचवण्याचा प्रयत्न हा अतिशय दुर्दैवी आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. सरकार नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नसेल तर हे देशद्रोह्यांसाठी समर्पित सरकार आहे, असेच म्हणावे लागेल, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे

दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही.  ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.  उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे भाजप मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अधिवेशनात लावून धरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या-

Aurangabad | काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला थंड प्रतिसाद? तरीही स्वबळावर निवडणूका लढवणार, औरंगाबादेत काय स्थिती?

Russia-Ukraine Crisis: यूक्रेनमध्ये विद्यार्थ्यांसोबत ज्योतिरादित्य शिंदेंचा मराठीतून संवाद

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.