सरकार आहे पण शासन नाही, केवळ बदल्यांची फॅक्टरी, कोरोना काळातले मृत्यू लपवले; फडणवीसांचा घणाघात

| Updated on: Nov 29, 2021 | 1:50 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्य सरकारला चोहोबाजूंनी घेरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते मंत्र्यांपर्यंत एकेकांवर टीका आणि आरोप करत त्यांची अक्षरशः पिसे काढली.

सरकार आहे पण शासन नाही, केवळ बदल्यांची फॅक्टरी, कोरोना काळातले मृत्यू लपवले; फडणवीसांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.
Follow us on

मुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी राज्य सरकारला चोहोबाजूंनी घेरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) ते मंत्र्यांपर्यंत एकेकांवर टीका आणि आरोप करत त्यांची अक्षरशः पिसे काढली. हे सरकार आहे, पण शासन नाही. हे सरकार म्हणजे निव्वळ बदल्यांची फॅक्टरी आहे. कोरोना काळातले मृत्यू या राज्य सरकारने लपवले, असा घणाघात त्यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते.

लालफितीमध्ये गोष्टी अडकल्या

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारच्या लालफितशाहीमध्ये आगप्रतिबंधक गोष्टीही अडकल्या. भंडाऱ्यात मुलांचा मृत्यू झाला. सरकारने दीड वर्ष कारवाई केली नाही. आग लागू शकते. मात्र, ती कशामुळे लागते. ते शोधून काढणार की नाही. प्रतिबंध करणार की नाही. या साऱ्यासाठी तुम्ही जबादार आहात, असे खडेबोल त्यांनी सुनावले.

मुंबई टेस्टिंगमध्ये 17 व्या स्थानी

कोरोनाचे टेस्टिंग मुंबईत जास्त होते म्हटले जाते. मात्र, मी आकडेवारी दिली. आपण 17 व्या 14 व्या क्रमांकावर होतो. पहिल्या क्रमांकावर कधीच नव्हतो. हा खोटा दावा वारंवार केला. तसेच मृत्यू लपवले. कशा प्रकारे मृत्यू लपवले ते सांगतो. मृत्यूचे अवरेज काढा. कमी वाढ काढा. आत्ताचे आकडे काढा. एकूण मृत्यूची संख्या नोंद असतेच. कारण मृत्यू सर्टीफिकेटशिवाय घर चालत नाही. एकूण मृत्यू फक्त महाराष्ट्रातच वाढले आहेत. इतर राज्यांचेही एकूण मृत्यू चेक करा, असे आवाहन त्यांनी दिले.

जबाबदारी झटकतात

फडणवीस म्हणाले की, अंगावर आले की फेकून द्यायचे, अशी यांची वृत्ती आहे. सरकार आहे पण शासन नाही. कुठल्या खात्यात शासन दिसते. या सरकारमध्ये बदल्यांचा भ्रष्टाचार आहे. बदल्यांची फॅक्टरी आहेत. केवळ पैशांच्या देवाण-घेवाणीने बदल्या होतात. मग अशी माणसे टार्गेट घेऊनच काम सुरू करतात. त्यांना नजर वर करून विचारायची हिम्मत यांच्यात असू शकत नाही. राज्यात, जिल्ह्यात नेक्सेस आहे. अवैध दारू, वाळू, वाहतूक, सट्टा असे खूप मोठे जाळे आहे. हे कोणीही थांबवणार नाही. त्याला दिलेल्या पैशाची वसुली करायची आहे. पैसे घेतल्यानंतर त्यांना विचारायची हिम्मत नाही. त्यामुळेच यांना अधिवेशन घ्यायचे नाही. कारण तिथे विरोधक जाब विचारतात, असा आरोप फडवीस यांनी यावेळी केला.

इतर बातम्याः

ओमिक्रॉनमुळे साहित्य संमेलनाचे होणार काय, मुख्य मंडपाची आसनक्षमता 14 हजार, बाका प्रसंग उद्भवला…!

संदीप-सलीलची मैफल कंपूगिरी म्हणत ट्रोल; एकाच गल्लीतील कार्यक्रम म्हणून हिणवणे सुरू, नेमकं कारण काय…?

‘दोन वर्षात महाराष्ट्र 20 वर्षे मागे गेला, अर्ध मंत्रिमंडळ डागाळलेलं’, प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर घणाघात