Video |माळशिरसमध्ये बेकायदेशीररित्या रेड्यांच्या झुंजीचे आयोजन; एका रेड्याचा मृत्यू, कार्यक्रमाला सरपंच,उपसरपंच उपस्थित

खळवे गावात रेड्यांच्या झुंजी भरवण्यात सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांचा पुढाकार होता. विशेष म्हणजे प्रशासकीय कर्मचारी असलेल्या ग्रामसेवक  या रेड्यांच्या झुंजी बघण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रम स्थळावर गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते. तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कुठलया रेड्यांची झुंज लावायची हे ठेवले जात असल्याचेही समोर आले आहे.

Video |माळशिरसमध्ये बेकायदेशीररित्या रेड्यांच्या झुंजीचे आयोजन; एका रेड्याचा मृत्यू, कार्यक्रमाला सरपंच,उपसरपंच उपस्थित
male buffalo death
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 5:03 PM

अकलुज- माळशिरसमधील खळवे गावात रेड्यांच्या झालेल्या झुंजीमध्ये एका रेड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रेड्यांच्या झुंजीवर कायदेशीररित्या बंदी असतानाही, नियम झुगारून या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. या टकरीमध्ये एका रेड्याचा मृत्यू झाल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दिवाळीनिमित्त खळवे गावातील म्हसोबा मंदिराच्या पटांगणात रेड्याची झुंजी भरविण्यात आल्या होत्या. सकाळी 9 वाजल्यापासूनच या झुंजींना सुरुवात झाली होती. याचवेळी भंडीशेगाव येथील एक रेडाव पटवर्धन कुरोली येथील एक रेडा अश्या दोन रेड्यांची झुंज लावण्यात आल्या होत्या.  झुंज सुरु झाल्यानंतर दोन्ही रेड्यांमध्ये काही काळ झुंज झाली. मात्र काही वेळातच झुंजीमध्ये पटवर्धन कुरोली येथील रेडा बुझला. त्यानंतर बुझलेला पटवर्धन कुरोलीचा रेडा बिथरून रस्त्याने सैरावैरा धावू लागला. साधारण तीन ते चार किलोमीटर पळाल्यानंतर खाली कोसळून त्या रेड्याचा मृत्यू झाला.

झुंज भरवण्यास सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांचा पुढाकार

खळवे गावात रेड्यांच्या झुंजी भरवण्यात सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांचा पुढाकार होता. विशेष म्हणजे शासकीय कर्मचारी असलेल्या ग्रामसेवक  या रेड्यांच्या झुंजी बघण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रम स्थळावर गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते. तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कुठलया रेड्यांची झुंज लावायची हे ठेवले जात असल्याचेही समोर आले आहे.ग्रामसेवक सतीश गीते यांना संपर्क केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.

प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करत अश्या झुंजीचे आयोजन करणाऱ्ऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या प्रकारे मुक्या जनावरांच्या झुंजी लावून पशुहत्येस जबाबदार ठरलेल्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

”बेकायदेशीररित्या जनावरांच्या झुंजीचे आयोजन करणारे गावाचे सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामसेवक यांना निलंबित करावे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा .अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार ”  भगवान शिवाजी पाटील, ग्रामस्थ, खळवे 

या घटनेबाबत वेळापूर पोलीस ठाण्याचे खळवे बीट अंमलदार काझी यांना फोन वरून संपर्क साधला असता त्यांनी सदर प्रकाराबाबत आम्हांला कल्पना नसून तक्रार आल्यास कारवाई करू अशी माहिती दिली.

हे ही वाचा:

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 11 पैकी 6 जणांचा गुदमरुन मृत्यू, तर चौघे होरपळले; शवविच्छेदन अहवाल पूर्ण

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा कधी? हिंगोलीत असंतोषातून वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पाकिस्तानी नौदलाचा गुजरात किनाऱ्यावर गोळीबार, एका भारतीय मच्छिमाराची हत्या

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.