भाजपला ठाकरेंचा धक्का, माजी खासदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत
Uddhav Thackeray Shiv Sena: माजी खासदार शिवाजी कांबळे हे सध्या भाजपाच्या प्रदेश कमिटीमध्ये पदाधिकारी होते. काँग्रेसच्या बालकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम १९९६ मध्ये त्यांनी केले होते. शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा पराभव करून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकाविला होता.
लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा ज्वर वाढता आहे. बड्या नेत्यांच्या सभा होत आहेत. विदर्भातील मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार तोफा आज थंडवणार आहे. निवडणुकीच्या या वातावरणात नाराज झालेले नेते दुसऱ्या पक्षाची वाट धरत आहे. मराठवाड्यातील काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण नुकतेच भाजपात आले होते. आता मराठवाड्यात भाजपला धक्का बसला आहे. धराशिवचे भाजपाचे नेते आणि माजी खासदार शिवाजी कांबळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाजी कांबळे दोन वेळा खासदार राहिले आहेत. तसेच पक्षाच्या प्रदेश कमिटीत ते पदाधिकारी आहे.
शिवाजी कांबळे यांची पुन्हा घर वापसी
शिवाजी कांबळे यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघातून 1996 व 1999 साली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. दोन्ही वेळा ते शिवसेनेत होते. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली. परंतु काँग्रेस उमेदवार अरविंद कांबळे यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यानंतर ते शिवसेना सोडून भाजपत गेले होते. आता पुन्हा ते स्वगृही जात आहेत.
भाजपच्या प्रदेश कमिटीत पदाधिकारी
माजी खासदार शिवाजी कांबळे हे सध्या भाजपाच्या प्रदेश कमिटीमध्ये पदाधिकारी होते. काँग्रेसच्या बालकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम १९९६ मध्ये त्यांनी केले होते. शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा पराभव करून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकाविला होता. आता पुन्हा ते भाजप सोडून शिवसेनेत जात आहे.
तीन लोकसभा लढवल्या, दोनमध्ये विजय
1996 – विजयी 15,919
शिवाजी कांबळे = शिवसेना = 1,98, 521 मते
अरविंद कांबळे = काँग्रेस = 1,82,602
1999 – विजयी – 59,073
शिवाजी कांबळे = शिवसेना = 2,52,135
कानिफनाथ देवकुळे = राष्ट्रवादी = 1,93,062
1998 = पराभूत = 47,018 मतांनी
अरविंद कांबळे – काँग्रेस = 2,80,592
शिवाजी कांबळे = शिवसेना = 2,33,574
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. मोदी यांनी राज्यात शिवसेना फोडली. शिवसेनेचा सातबाऱ्यावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिंदे यांचे नाव लिहिले. उद्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ते असेच करतील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.