Osmanabad | साखर कारखानदारीवरून पवारांवर माझे आक्षेप, पण ते जातीयवादी नाहीत, राजू शेट्टींची उस्मानाबादेत प्रतिक्रिया

मी गेली अनेक वर्षे शरद पवारांसोबत (Sharad Pawar) काम करत आहे. साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर माझे पवारांवर आक्षेप आहेत, मात्र पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी उस्मानाबादमध्ये दिली.

Osmanabad | साखर कारखानदारीवरून पवारांवर माझे आक्षेप, पण ते जातीयवादी नाहीत, राजू शेट्टींची उस्मानाबादेत प्रतिक्रिया
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची उस्मानाबादेत प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 2:38 PM

उस्मानाबाद : मी गेली अनेक वर्षे शरद पवारांसोबत (Sharad Pawar) काम करत आहे. साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर माझे पवारांवर आक्षेप आहेत, मात्र पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी उस्मानाबादमध्ये दिली. ऊस हे आळशी लोकांचं पिक आहे, असं वक्तव्य काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर राजू शेट्टी यांनी उत्तर दिलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) हुंकार यात्रेला आजपासून उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली. त्यावेळी त्यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी विविध राजकीय विषयांवर संवाद साधला.

‘आळशी लोकांचे पीक’ असं पवार म्हणालेच कसे?

ऊस हे आळशी लोकांचं पीक आहे, हे शरद पवार कसेच म्हणाले, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. आजपर्यंत शेतीचं सगळ्यात जास्त ज्ञान पवार साहेबांना आहे, असं वाटत होतं. मात्र ते कुठेतरी आता चुकीचं वाटत आहे. एकमेव ऊस पीक आहे, ज्याला बंधनकारक हमीभाव आहे. तशाच प्रकारचा हमी भाव इतर पिकांना मिळाला असता तर निश्चितच शेतकरी त्याकडे वळाला असता, असं राजू शेट्टी म्हणाले.

‘ धर्माबाहेर जाऊन सामान्यांचे प्रश्न मांडा’

प्रत्येक जण आपला धर्म पाळतो. ही सहज भारतीय प्रवृत्ती आहे. त्याचे प्रदर्शन करायची गरज नाही. प्रत्येक घरात देवघर आहे. तिथे तासंतास पूजा करावी. मात्र त्याचे प्रदर्शन करण्याची किंवा जबरदस्ती करण्याची गरज नाही. जाती धर्माच्या बाहेर जाऊन जे सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडतील त्याला समर्थन आहे. वीज , पेट्रोल डिझेल गॅस महागाई याकडे लक्ष द्या , यावर चर्च हवी, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टू यांनी दिली.

‘सध्याच्या राजकारणाची किळस येते’

सध्या सुरु असलेल्या राजकारणाचा स्तर घसरला असून त्याची किळस महाराष्ट्रातील जनतेला येत आहे, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. ते म्हणाले, ‘ राजकीय प्रगल्भता बाजूला ठेवून पुरोगामी महाराष्ट्रात एकमेकांवर आरोप करणे सुरु आहे. महाविकास आघाडी किंवा भाजप हे जनतेच्या प्रश्नावर बोलायचे सोडून देत आहेत. महागाई पेट्रोल डिझेल दरवढं यावर बोलत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘सत्ताधारी-विरोधक दोघेही अपयशी’

राजकीय दुरावा होत असतो. मात्र जनतेचे प्रश्न बाजूला पडत आहेत. सत्ताधारी व विरोधक हे दोन्ही अपयशी असून तुम्ही आमचे काढू नका आम्ही तुमचे नाही असे संगंमताने सुरु आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.

‘दिवसा वीज मिळणेसाठी कोर्टात जाणार’

लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना त्रास होतोय, त्यावर पुढील रणनितीबाबत सांगताना राजू शेट्टी म्हणाले ,’ भारनियमनने शेतकरी त्रस्त , दिवसा वीज मिळाली असती तर सोपे झाले असते मात्र जबरदस्तीने वीज रात्री दिली जाते , शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकारावर सरकार आक्रमण करित आहे. दिवसा वीज न दिलयाने मानवी हक्कांची पायमल्ली होत असून यासाठी कोर्टात दाद मागणार आहे. 1 मे रोजी ग्रामसभेत दिवसा वीज पुरवठा यावर ठराव घेणार आहे.आकडेवारी गोळा करणे सुरु, गावसभा घेऊन माहिती घेणार. मृत्यूला सरकार जबाबदार धरावें अशी मागणी कोर्टात करणार आहे.

भाजपमध्ये जाणार नाही, महाविकास आघाडी संबंध तोडले

महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला. ते म्ङणाले, ‘ 800 शेतकऱ्यांचा बळी ज्यांनी घेतला त्याच्या भाजप सोबत जाणार नाही. 20 वर्षापासून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष व काम करतोय , निवडणुका दुय्यम मुद्दा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे ते मांडत राहणार. महाविकास आघाडीशी 5 एप्रिल रोजी संबंध तोडले आता पुन्हा ते जोडले जाणार नाही.

इतर बातम्या-

BJP RATH : भाजपच्या पोलखोल रथाची काच फोडणाऱ्या चौघांची ओळख पटली, तपासात आणखी माहिती उघड होण्याची शक्यता

PM kisan Yojna : 11 व्या हप्त्याची उत्सुकता शिघेला, तक्रार निवारण्यासाठीही सरकारने केली सोय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.