उस्मानाबाद! स्वस्त आणि मस्त फिरा, तुळजाभवानी दर्शन ते नळदुर्ग किल्ला, विश्रामगृहांची किंमत एकदम किफायतशीर

नळदुर्ग किल्ल्यावर अनेक मराठी, तेलगू गाण्यासह चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे अनेक जण येथे फोटोसेशन आणि फोटोग्राफी करण्यासाठी प्राधान्य देतात (Osmanabad tourism places).

उस्मानाबाद! स्वस्त आणि मस्त फिरा, तुळजाभवानी दर्शन ते नळदुर्ग किल्ला, विश्रामगृहांची किंमत एकदम किफायतशीर
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 8:25 PM

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व असून हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्माची पवित्र धार्मिक स्थळे, लेणी, किल्ले असे वैभव या जिल्ह्यात आहे. सुट्टी आणि नववर्षाच्या निमित्ताने तुळजाभवानी दर्शन आणि नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची इथे मोठी गर्दी असते (Osmanabad tourism places).

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे असून हे ठिकाण उस्मानाबाद पासून 24 तर सोलापूर पासून 45 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर आहे. सोलापूर आणि उस्मानाबाद येथे रेल्वे स्थानक आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील अनेक जणांनी कुलदैवत आहे. त्यामुळे नेहमीच इथे भाविकांची गर्दी असते.

तुळजापूर येथे मंदिर संस्थानचे विश्रामगृहसह खासगी हॉटेल आहेत. इथे एक दिवसाचा दर 1 हजार ते दीड हजार आहे. तुळजापूर येथील उस्मानाबादी शेळीचे मटन आणि त्यातील अनेक पदार्थ हे खवय्यांसाठी मेजवानी आहेत. विशेष म्हणजे तुळजापूर येथे हळद कुंकू, माळ आणि परडी घेण्यासाठी भाविक येतात. साळुंके परिवाराची पुष्पविहार मलाई लस्सी आणि वझे यांच्या दुकानातील हळद-कुंकू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पसंदी असते.

तुळजापूर येथे आल्यावर भाविक नळदुर्ग येथील भुईकोट किल्ला पाहायला जाऊ शकतात. तुळजापूर ते नळदुर्ग हे अंतर 40 किमी असून नळदुर्ग किल्ला हा युनिटी मल्टीकॉन या संस्थेने विकसित केला आहे. या किल्ल्याच्या मध्यभागातून बोरी नदी वाहत असून यावर नर-मादी हे धबधबे आहेत, जे नेहमी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. या ठिकाणी किल्ल्यात बोटींग आणि अॅडव्हेंचर स्पोर्टची व्यवस्था आहे.

नळदुर्ग किल्ल्याच्या शेजारी युनिटी या समूहाचे नदी आहे. या नदीच्या शेजारी युनी वंडर्स रिसॉर्ट असून इथे हट स्वरूपाचे निवासी व्यवस्था निसर्गरम्य ठिकाणी आहे. या किल्ल्याच्या आणि नदी शेजारी असलेल्या 8 एकर जागेतील रिसॉर्टमध्ये राहण्याची उत्तम सोय असून रात्री शेकोटी पेटवून, संगीत रजनीसह पार्टीची व्यवस्था आहे. इथे प्रतिव्यक्ती 1 ते 2 हजार असे राहण्याचे आणि जेवणाचे पॅकेज आहे. या रिसॉर्टवर रात्री छोट्या पार्टी आणि कौटुंबिक संमेलन सुद्धा आयोजित केले जातात.

नळदुर्ग किल्ल्यावर अनेक मराठी, तेलगू गाण्यासह चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे अनेक जण येथे फोटोसेशन आणि फोटोग्राफी करण्यासाठी प्राधान्य देतात (Osmanabad tourism places).

नळदुर्ग पासून अवघ्या 3 किमी अंतरावर अणदूर हे गाव असून या ठिकाणी खंडोबा मंदिर आहे. या ठिकाणी खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह झाला आहे. त्यामुळे तुळजाभवानी, खंडोबा दर्शन आणि नळदुर्ग किल्ला या तीनही ठिकानांची एकाच दिवशी भेट घेता येतील.

उस्मानाबाद शहरात हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा दर्गा आहे. हा दक्षिण भारतातील सर्वात मोठे घुमट असलेला दर्गा असून अजमेर नंतर या दर्ग्याला विशेष महत्व आहे. तसेच उस्मानाबाद येथे जैन आणि बौद्ध धर्माच्या लेणी आहेत. त्या शहरापासून 4 किमी अंतरावर आहेत. अजिंठा वेरूळ लेण्यापूर्वी या ठिकाणी लेण्या खोदण्यात आल्या होत्या. मात्र सच्छिद्र दगड लागल्याने त्या अर्धवट असून सुस्तिथीत आहेत.

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 25 किमी अंतरावर रोमन कालीन मोठी बाजारपेठ असलेले तेर हे गाव आहे. या ठिकाणी लामतूरे पुरातन वस्तू संग्रहालयसह त्रिविक्रम मंदिर आणि बौद्ध स्तूप आहेत. या म्युझियममध्ये रोम आणि तेर येथील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध असलेले अनेक पुरावे दर्शविणारे वस्तू आहेत. संत गोरोबा काका हेही तेरचे असून त्यांचे येथे मंदिर आणि त्यांनी बनविलेली पाण्यावर तरंगणारी वीट आहे.

उस्मानाबाद औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर 60 किमी अंतरावर कुंथलगिरी जैन धर्माचे पवित्र असे भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर असून निजाम काळापासून हे क्षेत्र अहिंसा क्षेत्र म्हणून घोषित आहे. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. इथला खवा पासून बनविलेले पेढा हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथे प्राचीन किल्ला असून या किल्ल्याच्या चारही बाजूला खंदक आहेत. या किल्ल्यात आजही पुरातन दारुगोळा पाहायला मिळतो. या किल्ल्यापासून सीना कोळेगाव या धरण क्षेत्रात कल्याणस्वामींचा मठ असून येथे दासबोध या हस्त लिखित दुर्मिळ ग्रंथाची प्रत आहे.

हेही वाचा : आता महाराष्ट्रातही Sea Plane प्रवासाची संधी, मुंबई-शिर्डीसह ‘या’ मार्गावर लवकरच सेवा सुरु होणार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.