Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

221 किमी ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, 130 किमी तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी 12000 कोटी; नितीन गडकरींची माहिती

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पाडला. या कार्यक्रमासाठी मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

221 किमी ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, 130 किमी तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी 12000 कोटी; नितीन गडकरींची माहिती
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 4:17 PM

मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पाडला. या कार्यक्रमासाठी मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. तसेच केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या दोन्ही मार्गांच्या उभारणीसाठी 12 हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असून यामुळे दळणवळण अगदीच सोपे होणार आहे. (12000 crore for 221 km Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg, 130 km Tukaram Maharaj Palkhi Marg : Nitin Gadkari)

या दोन प्रकल्पांविषयी नितीन गडकरी यांनी माहिती दिली. गडकरी म्हणाले की, 221 किलोमीटर अंतर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गासाठी 7 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचं काम पुढील एक ते सव्वा वर्षात पूर्ण होईल, अशी आशा आहे. तसेच संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी 5 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची लांबी 130 किलोमीटर इतकी आहे.

पालखी तळांच्या कामांसाठी राज्य सरकार 1248 कोटी खर्च करणार

दरम्यान, राज्य सरकार या पालखी मार्गावरील पालखी तळांच्या कामासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार 1248 कोटी खर्च करणार आहे. यामुळे वारकऱ्यांची वारी अजून सोपी होईल. गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्री जाणारे भक्तीमार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे, याचा मला सर्वाधिक आनंद होत आहे.

गडकरी म्हणाले की, पंढरपूर ही संतांची भूमी, केवळ पंढरपूरच नव्हे तर महाराष्ट्र ही साधूसंतांची भूमी आहे. येथील साहित्य आणि कलेत संतांचं मोठं योगदान आहे. या साधूसंतांसाठी पंढरपूर हे सर्वात विशेष स्थान आहे. दरवर्षी येथे चार यात्रा होतात. महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात वारकरी येथे पायी येतात. या वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग निर्माण करण्याचं काम मला मिळालं आहे, हे माझं सौभाग्य आहे.

आता भाविक वर्षभर कधीही चारधाम, गंगोत्री, बद्रीनाथला जाऊ शकतील

गडकरी म्हणाले की, या प्रकल्पांचं काम हाती घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी आमची सर्व विभागांची बैठक घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, आपल्या देशात लाखो, करोडो लोक तीर्थयात्रांना जातात, ही तीर्थक्षेत्र आपला सांस्कृतिक ठेवा आहे. या तीर्थक्षेत्री जाणारे रस्ते चांगले असायला हवेत, तेथे स्वच्छता असायला हवी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथील प्रसाधनगृह स्वच्छ असली पाहिजेत, असा मोदीजींचा आग्रह होता. त्यामुळे आम्ही भारतमाला परियोजना सुरु केली.

भारतमाला परियोजनेत देशभरातील 50 धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यावर 12070 कोटी रुपये खर्च करुन 673 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. तर बाकी 827 किलोमीटरचं काम सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर पूर्ण केलं जाईल. त्यामुळे आगामी काळात भाविक वर्षभर कधीही चारधाम, गंगोत्री, बद्रीनाथला जाऊ शकतील. मानसरोवरचा मार्ग पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात तुळजापूर, शेगाव, कोल्हापूर, माहूर, शिर्डी येथील भक्तीमार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न जात आहे राज्यातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत, याचा मला आनंद होतोय, असं गडकरी म्हणाले.

इतर बातम्या

पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi LIVE in Pandharpur : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालखी महामार्गांचे ऑनलाईन भूमीपूजन

(12000 crore for 221 km Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg, 130 km Tukaram Maharaj Palkhi Marg : Nitin Gadkari)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.