महापूर ओसरताच नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी, मंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून कृष्णाकाठच्या 22 गावात 14 आरोग्य पथके 

महापूर ओसरताच पुरबाधित गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून कृष्णाकाठच्या 22 गावात 14 आरोग्य पथके कार्यरत करण्यात आली आहे.

महापूर ओसरताच नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी, मंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून कृष्णाकाठच्या 22 गावात 14 आरोग्य पथके 
विश्वजीत कदम यांच्याकडून सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी आरोग्य टीम कार्यरत
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 9:36 AM

सांगली :  महापूर ओसरताच पुरबाधित गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत पतंगराव कदम यांच्या वतीने एक कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून कृष्णाकाठच्या 22 गावात 14 आरोग्य पथके कार्यरत करण्यात आली आहे.

भारती विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालय पुणे यांच्याकडून मदत आणि उपचार

पलुस तालुक्यातील कृष्णाकाठच्या महापूरबाधीत बावीस गावात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. भारती विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालय पुणे यांच्या विद्यमाने वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय सांगलीचे वैद्यकीय मदत व उपचार पथक गावोगावी फिरून पुरग्रस्तांची मोफत तपासणी व उपचार करीत आहेत.

कृष्णाकाठच्या 22 गावात 14 आरोग्य पथके

यासाठी तज्ञ डॉक्टर्स, नर्सींग स्टाफसह जवळपास 416 जणांची निवड करण्यात आली असून त्यांची  14 पथके तयार करण्यात आली आहेत. या आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिक उपचारासाठी गर्दी करत आहेत. तर स्वतः राज्यमंत्री विश्वजीत कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड या सर्व शिबिरांना भेटी देऊन आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करत आहेत.

पाणी ओसरताच पंचनामा प्रक्रियेला सुरुवात

सांगली मिरजेतील पुरबाधित भागातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महापालिका महसूल, महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या टीमकडून प्रत्यक्ष पंचनामा करण्याच्या कामास सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली घरपट्टी विभागाचे लोक यासाठी मदत करत आहे.

सांगली महापालिका क्षेत्रात एकूण 37 टीम या घरगुती पंचनामे करत आहेत तर 22 टीम या व्यापारी आस्थापनाचे नुकसानीचे पंचनामे करणार आहेत। प्रत्येक टीमला तीन कर्मचारी आणि एक व्हिडिओ ग्राफर देण्यात आला आहे. ही टीम घरोघरी जाऊन माहिती घेत आहे. तसेच नुकसानीबाबत शासनाच्या निकषानुसार फॉर्म भरले जात आहेत. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर याचा अहवाल शासनाला जमा केला जाणार आहे.

(14 health teams from 22 villages in Krishnakath by maharashtra Minister Vishwajeet Kadam)

हे ही वाचा :

प्रत्येकवेळी नुकसान., जगायचं तरी कसं… भुवनेश्वरवाडीच्या पूरग्रस्तांच्या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या व्यथा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.