Palghar Swine Flue : गिरगाव आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यू, उपचारानंतर प्रकृती स्वस्थ
सध्या वसतिगृहात 228 मुलं-मुली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून खबरदारी म्हणून वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बंदी केली असून बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात आहे.
पालघर : तलासरी झाई येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी झिका आणि स्वाईन फ्ल्यू झाल्याचे उघड झाले असताना आता गिरगाव आश्रम शाळे (Girgaon Ashram School)तील 15 विद्यार्थ्यां (Students)ना स्वाईन फ्ल्यू (Swine Flue) बाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या वसतिगृहात 228 मुलं-मुली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून खबरदारी म्हणून वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बंदी केली असून बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात आहे.
खबरदारी म्हणून वसतिगृहातच विलगीकरणात ठेवलंय विद्यार्थ्यांना
तलासरी तालुक्यातील गिरगाव येथील एकात्मिक आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील 22 विद्यार्थ्यांची आजारी असल्याने तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 14 मुली व एक मुलगा अशा विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे तपासणीअंती समोर आले होते. तर तर 3 विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि उर्वरित व्हायरल इन्फेक्शने आजारी असल्याचे समोर आले होते. सध्या स्वाईन फ्ल्यू झालेले विद्यार्थी उपचारानंतर स्वस्थ असून खबरदारी म्हणून त्यांना वसतिगृहातच विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे.
झाई आश्रमशाळेतील सात विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू
झाई आश्रम शाळेत सात विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू ची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली. झाई आश्रम शाळेतील एका सात वर्षीय विद्यार्थ्याला झीकाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर गव्हर्मेंट इंडियन मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअरच्या डेव्हलपमेंट ऑफ सेंट्रल मल्टी डिसिप्लिनरी टीमने या आश्रम शाळेत आरोग्य तपासणी केली. त्यात झाई आश्रम शाळेतील आणखी सात विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घाई आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. (15 students of Girgaon Ashram School Palghar affected by swine flu)