Chandrapur Fishing : सकमूर गावातील 25 शेतकरी करीत आहेत व्यवसाय, नदीलगत असलेल्या शेतात 5 शेततळे खोदून सोडले मत्स्यबीज

या चार दिवसात सुमारे सात ते आठ क्विंटल मासोळी विकली जाते. सकमूरच्या शेतकऱ्यांनी अनेक शेतीप्रयोग केले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. आता तयार केलेल्या पाच शेततळ्यानी त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.

Chandrapur Fishing : सकमूर गावातील 25 शेतकरी करीत आहेत व्यवसाय, नदीलगत असलेल्या शेतात 5 शेततळे खोदून सोडले मत्स्यबीज
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावाचा पुढाकारImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 6:05 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी (Gondpimpri) तालुक्यातील सकमूर हे गाव वर्धा नदीचा (Wardha River) काठावर वसले आहे. एकीकडे वर्धा नदीचे पात्र तर दुसरीकडे जंगल आहे. सकमूर गावातील शेतीला वन्यजीवांचा (Wildlife) नेहमीच धोका असतो. वर्धा नदी शेतकऱ्यांना वरदान आहे. मात्र नदीला पूर आला की शेती मातीमोल होते. शेतीत होणारे नुकसान बघता गावातील शेतकरी शेतीपुरक व्यवसायाकडे वळले आहेत. गावातील 25 शेतकऱ्यांनी शेतातील शेततळ्यात मस्त्यपालन सुरू केले आहे.

आठवड्यातून चार दिवस पकडतात मासे

शेततळ्यातील मासे ताजे असतात. त्यामुळं या माशांना मोठी मागणी आहे. यातून शेतकऱ्यांना बरीच मिळकत होत आहे. ताजे आणि चविष्ट मासे मिळत असल्याने ग्राहकांची याला मोठी मागणी आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता दूरवरून घाऊक मासोळी विक्रेते सकमूर गाव गाठतात. आठवड्यातून चार दिवस शेततळ्यातील मासे पकडले जातात.

शेततळ्यांनी उंचावला आर्थिक स्तर

या चार दिवसात सुमारे सात ते आठ क्विंटल मासोळी विकली जाते. सकमूरच्या शेतकऱ्यांनी अनेक शेतीप्रयोग केले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. आता तयार केलेल्या पाच शेततळ्यानी त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.

हे सुद्धा वाचा

शेती काही भरोश्याची नाही

शेती आता भरवश्याची राहिलेली नाही. हे वाक्य नेहमी कानावर पडते. काही अंशी ते खरं ही आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी यामुळं बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. मोठ्या कष्टानं बळीराजा शेती फुलवितोय. प्रसंगी कर्ज काढतो. शेतीत अक्षरशः जीव ओततो. मात्र या शेतीची जेव्हा माती होतेय. तेव्हा हा राजा खचतोय. टोकाचा निर्णय घेतो.

कणखर बाणा काही खचत नाही

शेतीवर संकटाची मालिका सुरू असतानाही यातील बहुतांश शेतकरी काही खचत नाहीत. गोंडपिपरी तालुक्यातील सकमूरने हेच उदाहरण घालून दिले आहे. असं प्रयोगशील शेतकरी गजानन काळे यांनी सांगितलं. स्थानिक घाऊक मासे विक्रेत्यांनाही योग्य दरात येथे ताजे मासे मिळतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.