कोकणातील चिखल हटवण्यासाठी 35 डंपर मागवणार, मुंबई, नवी मुंबईतून येणार कामगार, चिपळूणमध्ये मेडिकलही सुरू करणार : उदय सामंत
अतिवृष्टी आणी दरडी कोसळण्याच्या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभं आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी : अतिवृष्टी आणी दरडी कोसळण्याच्या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभं आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. चिपळूण पंचायत समिती येथे आयोजित नैसर्गिक आपत्तीच्या पाश्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, विभागीय आयुक्त पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (35 dumpers to be ordered to remove mud in Konkan, workers will come from Mumbai, Navi Mumbai : Uday Samant)
उदय सामंत म्हणाले की, पुराचे पाणी ओसरले असून पाणी ओसरल्यानंतर रोगराई होऊ नये, व्यापाऱ्यांचे सर्व पंचनामे त्यांना त्रास न होता तात्काळ करावेत, यासाठी महसूल यंत्रणा व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना निर्देश दिले आहेत. व्यापाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी प्रशासनाने फोटोग्राफर, व्हीडीओग्राफर ची व्यवस्था केली असून ते बाजारात फोटो, व्हिडीओ शुटींग करत आहे. व्यापाऱ्यांशीही प्राथमिक चर्चा झाली असून त्यांना जे अपेक्षित आहे ते शासनाकडे मांडू. शासन या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येकाच्या मागे ठामपणे उभं आहे, असेही ते म्हणाले. अजूनही चिखल मोठया प्रमाणावर असल्याने 30 ते 35 डंपरची आवश्यकता असून त्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मुंबई, नवी मुंबई येथील स्वच्छता करणाऱ्या एजन्सींशी संपर्क साधण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
औषध फवारणीही युध्दपातळीवर सुरु करण्यात येत असून यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी वेगवेगळया टीम तयार करण्यात आल्या आहेत. महामार्गावरुन उद्या संध्याकाळपर्यंत कमी वजनाची वाहने सुरु करता येऊ शकतील, असा विश्वासही सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. चिपळूणमधील सर्व मेडीकल बंद असल्याने चिपळूणवासियांना आवश्यक औषधांसाठी शासकीय मेडीकल सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण व शहरी भाग स्वच्छ करणे, विमा कंपनी व व्यापारी यांच्यात समन्वय साधणे, पंचनामे, पाण्यासाठी जनरेटर आणणे, जेसीपी आणणे, औषध फवारणी आदी विषयांवर या आढावा बैठकीत चर्चा झाली.
इतर बातम्या
महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
(35 dumpers to be ordered to remove mud in Konkan, workers will come from Mumbai, Navi Mumbai : Uday Samant)