Tuljabhavani Temple : सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील 2 पुजाऱ्यांवर गुन्हा नोंद

मंदिरात भाविकांना दर्शन रांगेत सोडण्याच्या कारणावरून पुजाऱ्यांनी एकत्र येत सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दोन पुजाऱ्यांनी सुरक्षा रक्षक दीपक चौघुले यांना दगड, नारळ व विटांनी गंभीर मारहाण करीत फरफटत बाहेर आणले. सुरक्षा रक्षक चौघुले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी सोलापूरला दाखल झाल्यानंतर त्यांच्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Tuljabhavani Temple : सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील 2 पुजाऱ्यांवर गुन्हा नोंद
सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील 2 पुजाऱ्यांवर गुन्हा नोंदImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 12:01 AM

उस्मानाबाद : मंदिरातील सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण (Beating) करीत गंभीर जखमी केल्याबद्दल तुळजाभवानी मंदिरातील 2 पुजाऱ्यांवर 307 कलम अंतर्गत गुन्हा (Case) नोंद करण्यात आला आहे. दीपक चौघुले असे मारहाण करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. तर पुजारी कृष्णा जितकर व संदीप टोले अशी गुन्हा नोंद केलेल्या पुजाऱ्यांची नावे आहेत. दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तुळजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. पुजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (A case has been registered against 2 priests of Tulja Bhavani temple for beating a security guard)

भाविकांना दर्शन रांगेत सोडण्याच्या कारणावरुन सुरक्षा रक्षकाला मारहाण

मंदिरात भाविकांना दर्शन रांगेत सोडण्याच्या कारणावरून पुजाऱ्यांनी एकत्र येत सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दोन पुजाऱ्यांनी सुरक्षा रक्षक दीपक चौघुले यांना दगड, नारळ व विटांनी गंभीर मारहाण करीत फरफटत बाहेर आणले. सुरक्षा रक्षक चौघुले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी सोलापूरला दाखल झाल्यानंतर त्यांच्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सख्या दोन भावांनी केला सशस्त्र हल्ला, हल्ल्यात मधला भाऊ जखमी

तुळजापूर तालुक्यातील नीलेगाव दोन भावांनी आपल्या सख्या भावाला तलवार आणि रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. लहान आणि मोठ्या भावाने मिळून शहाजान कुरणे याला मारहाण केली. शहाजानचा मोठा भाऊ सोहेल कुरणे आणि छोटा भाऊ लियाकत कुरणे यांनी मारहाण केली. तू घरात राहू नको म्हणून तलवार आणि रॉडने हल्ला केला असल्याचे शहाजान कुरणे याने सांगितले आहे. या हल्ल्यात शहाजान जखमी झाले असून या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. जखमींवर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. (A case has been registered against 2 priests of Tulja Bhavani temple for beating a security guard)

इतर बातम्या

Wardha : वर्ध्यात भरधाव वाहन पलटून दोन जण ठार, 19 जण जखमी; लग्नासाठी जात असताना घडला अपघात

मला आई बनायचेय, पतीला पॅरोल द्या; महिलेच्या याचिकेवर हायकोर्टाने दिला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.