अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ब्रेक, विजेच्या धक्क्याने अकरावीतील मुलीचे हात निकामी…

असे म्हणतात ना...की, नियती पुढे कोणाचेही काहीही चालत नाही. नियतीसमोर प्रत्येकाला झुकावे लागते. याचा प्रत्यक्ष आणि दुखद अनुभव नांदेड येथील घटनेने आला आहे. जी तरूणी दिवस-रात्र मेहनत करून अभ्यास करत होती आणि रात्रीचा दिवस करून अधिकारी होण्याचे स्वप्न बघत होती.

अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ब्रेक, विजेच्या धक्क्याने अकरावीतील मुलीचे हात निकामी...
संतोषी कौसल्ले
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 11:02 AM

प्रशांत चलींद्रवार tv9 मराठी नांदेड : असे म्हणतात ना…की, नियती पुढे कोणाचेही काहीही चालत नाही. नियतीसमोर प्रत्येकाला झुकावे लागते. याचा प्रत्यक्ष आणि दुखद अनुभव नांदेड येथील घटनेने आला आहे. भविष्यामध्ये मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुलीवर नियतीने घात केला… नांदेडमधील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. जी तरूणी दिवस-रात्र मेहनत करून अभ्यास करत होती आणि रात्रीचा दिवस करून अधिकारी होण्याचे स्वप्न बघत होती. मात्र, तिच्या आयुष्यामध्ये असे काही घडले की, तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. या तरूणीचे नाव संतोषी कौसल्ले असे आहे.

नांदेडमधील धक्कादायक घटना 

संतोषी नांदेडमधील श्रीपाद नगर येथे भाड्याच्या खोलीत राहते. पहिलीपासूनच अभ्यासात संतोषी हुशार होती. दहावीत 94 टक्के गुण प्राप्त करुन 11 वी काॅमर्सला प्रवेश घेतला होता. संतोषीचे वडिल हे ट्रक ड्रायव्हर आहेत, त्यांनीही मुलगी हुशार आहे म्हणून दिवस रात्र मेहनत करत तिला शिकवले…मात्र, नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. एक महिन्यापुर्वी घराच्या छतावर असलेल्या विद्युत तारेचा संतोषीला स्पर्श झाला…आणि होत्याचे नव्हते झाले.

अकरावीमध्ये शिकणाऱ्या मुलीचे दोन्ही हात निकामी 

या विजेच्या धक्यामुळे संतोषीचे दोन्ही हात भाजले…खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान तिचा एक हात काढावा लागला. तर दुसरा हात देखील निकामी झाला आहे. बरेच दिवस तर संतोषीला हे सांगण्यात देखील आले नव्हते की, तिचा हात काढण्यात आला आहे. संतोषीच्या उपचारासाठी 9 लाख रूपये खर्च आला आहे. वडीलांनी शेत विकून मुलीचा जिव वाचवला. संतोषिला आलेल्या अपंगत्वामुळे कौसल्य कुटुंब पुर्णतःखचून गेल आहे. जी संतोषी अधिकारी होण्याची स्वप्न बघत होती तिला मात्र, मोठा धक्काच बसला आहे.

संंबंधित बातम्या : 

Pune Crime: खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात घुसायचे, अंगठ्या चोरुन पसार व्हायचे; मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी तरुणांचा फंडा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जाती निहाय जनगणनेसाठी विधानभवनावर मोर्चा धडकणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.