अन् जिवात जीव आला… कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांचे रेस्क्यु ऑपरेशन; सर्वांची सुखरुप सुटका!

| Updated on: Jul 10, 2022 | 12:13 PM

शनिवार असल्याने सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहनासाठी रवाना झाले होते. सकाळी 9 वाजल्यापासुन मात्र प्रचंड प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने गिर्यारोहक शिखराखाली उतरुन आले असता नदीच्या पाण्यामुळे बारी व जहागिरवाडी या ठिकाणी पोहचु शकत नव्हते.

अन् जिवात जीव आला... कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांचे रेस्क्यु ऑपरेशन; सर्वांची सुखरुप सुटका!
Image Credit source: tv9
Follow us on

अहमदनगर : अकोले तालुक्यातील महाराष्ट्राचे (Maharashtra) ऐवरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला पुर आला. पुरामुळे शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांची राजुर पोलिस स्टेशन (Police station) व जहागिरदार वाडीतील युवकांनी सुखरुप सुटका केली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखराच्या परिसरात शनिवारी सकाळपासुन अतिवृष्टी होत होती. शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपुर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने कृष्णावंती नदीला पूर (Flood) आला.

गिर्यारोहकांनी पोलिस हेल्पलाईन क्रमांक 112 ला फोन करत माहिती दिली

शनिवार असल्याने सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहनासाठी रवाना झाले होते. सकाळी 9 वाजल्यापासुन मात्र प्रचंड प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने गिर्यारोहक शिखराखाली उतरुन आले असता नदीच्या पाण्यामुळे बारी व जहागिरवाडी या ठिकाणी पोहचु शकत नव्हते. तेव्हा काही गिर्यारोहकांनी पोलिस हेल्पलाईन क्रमांक 112 ला फोन करत पुराच्या पाण्यामुळे अडकल्याची माहीती दिली. हा संदेश तातडीने राजुर पोलिस स्टेशनला प्राप्त होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळावर हजर झाले.

हे सुद्धा वाचा

रेस्क्यु ऑपरेशन करून सुरक्षित बाहेर काढले

जहागिरदार वाडीतील काही व्यवसायिक, गाईड व गावकरी यांनी दोराच्या सहाय्याने नदीच्या पलिकडे अडकलेल्या गिर्यारोहकांना स्वत: नदीवरील एका केटीवेअरच्या ठिकाणी पाण्यात उभे राहत साखळी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. जवळजवळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे रेस्क्यु ऑपरेशन सुरच होते. संध्याकाळपर्यंत एकहजार गिर्यारोहकांची सुखरुप सुटका करण्यात पोलिस व गावक-यांनी बाजी मारली होती. या रेस्क्यु ऑपरेशन मध्ये राजुर पोलिसांकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस कर्मचारी अशोक गाढे, विजय फटांगरे व राकेश मुळाने सामिल झाले होते तर जहागिरदार वाडीतील युवकांची नावे समजु शकली नाहीत.