Sindhudurg Airport : 275 हेक्टरवर भव्यदिव्य विमानतळ, एअरबस, बोईंग उतरण्याचीही क्षमता, कोकणचा वर्ल्ड क्लास तुरा

मुंबई -गोवा महामार्गापासून 27 किलोमीटर, मालवणपासून 12 किलोमीटर अंतरावर हे विमानतळ आहे. या विमातळावरुन जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भेट देणेही सोईचे ठरणार आहे.

Sindhudurg Airport : 275 हेक्टरवर भव्यदिव्य विमानतळ, एअरबस, बोईंग उतरण्याचीही क्षमता, कोकणचा वर्ल्ड क्लास तुरा
275 हेक्टरवर भव्यदिव्य विमानतळ, एअरबस, बोईंग उतरण्याचीही क्षमता
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 7:37 AM

सिंधुदुर्ग : तुम्ही याआधी कधी विमानाने गोव्याला गेला असाल तर कोकणचा अफलातून साज तुमच्या नजरेस नक्कीच पडलेला असणार. आता हेच भाग्य तुम्हाला थेट सिंधुदुर्गात उतरवणाऱ्या विमानातून लाभणार आहे. पूर्वीच्या काळी जलवाहतूक आणि नंतर रस्ते वाहतूक अशी प्रवास व्यवस्था सुधारत गेलेल्या सिंधुदुर्गात अलीकडच्या काळात कोकण रेल्वे आणि आता तर थेट विमान वाहतूक सुरु होत आहे. सिंधुदुर्गवासियांसाठी ऐतिहासिक आणि भाग्याचा दिवस आज उजाडला आहे. 275 हेक्टरवर उभारलेले भव्यदिव्य चिपी परुळे विमानतळ म्हणजे कोकणच्या शिरपेचात मनाचा तुरा ठरणार आहे. चला तर या विमानतळाबाबत सविस्तर माहिती जाणून (Ability to land magnificent chipi airport, Airbus, Boeing on 275 hectares)

निसर्गाची मुक्तहस्ते उधळण पाहायची असेल, तर मग कोकणात जायलाच हवे, असे म्हटले जाते. कोकणात पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. निळाशार समुद्रकिनाऱ्यापासून ते नारळ-आंब्यांच्या बागा, कौलारू घरे, लाल माती, कोकणी संस्कृती अश्या वैविध्याने कोकण नटलेले आहे. कोकणचे हेच सौदर्य आता विमान प्रवासातून अगदी जवळून पाहता येणार आहे. शिवाय सिंधुदुर्गात मुंबईसारख्या शहरातून अवघ्या सव्वा तासात पोहोचता येणार आहे. सिंधुदुर्ग विमानतळाला चिपी विमानतळ असेही म्हणतात. कारण हे विमानतळ चिपी-परुळे येथे उभारण्यात आले आहे. मुंबई -गोवा महामार्गापासून 27 किलोमीटर, मालवणपासून 12 किलोमीटर अंतरावर हे विमानतळ आहे. या विमातळावरुन जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भेट देणेही सोईचे ठरणार आहे.

तीन वर्षांपूर्वी उतरले होते पहिले विमान

चिपी विमानतळाचे बांधकाम सन 2018 च्या उत्तरार्धात पूर्ण झाले. याच वर्षी अर्थात 12 सप्टेंबर 2018 रोजी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येथे एक टेस्ट फ्लाइट उतरले होते. 5 मार्च 2019 रोजी विमानतळाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे या विमानतळावरुन मुंबईहून उड्डाणे चालविण्यात येणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या कंपनीला तशी परवानगी दिली आहे. आजपासून या विमानतळावरुन व्यावसायिक उड्डाणे सुरु होणार आहेत. या विमानतळावर एअरबस, बोईंग उतरण्याचीही क्षमता आहे.

प्रकल्पाचे काम असे पूर्णत्वास गेले…

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरने 2009 मध्ये 95 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विमानतळ विकसित करण्याची बोली जिंकली होती. पुढे मार्च 2012 मध्ये प्रकल्पाला केंद्र सरकारकडून पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली. विमानतळाचे काम 2018 च्या दुसऱ्या सहामाहीत पूर्ण झाले. वास्तविक, त्याआधी चार वर्षांपूर्वीच म्हणजे ऑगस्ट 2014 पर्यंत विमानतळाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु खाजगी जमीन घेण्यातील किचकट प्रक्रियेबरोबरच इतर समस्यांमुळे कामाला विलंब झाला.

कोकणच्या पर्यटन विकासाला झपाट्याने चालना मिळणार

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) बिल्ड -ऑपरेट -ट्रान्सफर (BOT) या तत्त्वावर आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळ प्रा. ली.कडे विमानतळाचे काम सोपवले आहे. 3170 मीटर लांबीच्या धावपट्टीसह 275 हेक्टरच्या क्षेत्रावर हे विमानतळ विस्तारलेले आहे. 2500 मीटर धावपट्टी एअरबस ए 320 आणि बोईंग 737 सारख्या विमानांना सामावून घेऊ शकते. या विमानतळावर लवकरच परदेशी पर्यटक येऊ शकतील. त्यामुळे कोकणच्या पर्यटन विकासाला झपाट्याने चालना मिळणार आहे. (Ability to land magnificent chipi airport, Airbus, Boeing on 275 hectares)

इतर बातम्या 

MPSC Exam: मोठी बातमी, राज्य सेवा परीक्षेच्या 100 जागा वाढवल्या, एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर

मुंबईत शनिवारी फक्त महिलांसाठी लस, विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.