नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; तीन जण ठार, दहा जखमी
राहुरी तालुक्यातील गुहा फाटा परिसरात भिषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर दहा जण जखमी झाले. जखमींमधल्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील गुहा फाटा परिसरात भिषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर दहा जण जखमी झाले. जखमींमधल्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. कंटेनर, जीप आणि दुचाकी एकोंएकांना धडकून हा विचित्र अपघात झाला. या अपघातामधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तीन वाहनांचा अपघात
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील गृहा फाट्याजवळ नगर-मनमाड महामार्गावर हा भिषण अपघात झाला आहे. कंटेनर, जिप आणि दुचाकी एकोंएकांना धडकून हा अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातामध्ये जीपमधील तीन जण ठार झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून, तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अद्याप मृत आणि जखमींची नावे समोर आलेली नाहीयेत.
वाहतूक विस्कळीत
दरम्यान जीप, कंटेनर आणि दुचाकी धडकून हा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर काही काळ नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने घटनास्थळावरून हटवल्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत सुरू झाली. या अपघातामध्ये वाहनांचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
संबंधित बातम्या
निष्काळजीपणा भोवला, एक वर्षाच्या मुलाकडून गोळीबार; वडिलांचा मृत्यू