व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शुभेच्छा संदेश पाठवणाऱ्या मेंबर्सना अ‍ॅडमिनचा दणका, 10 हजारांचा दंड वसूल!

एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनने नियम न पाळणाऱ्या सदस्यांना चक्क दंड ठोठावला आहे. इतकेच नव्हे तर त्याने दंड वसूलदेखील केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शुभेच्छा संदेश पाठवणाऱ्या मेंबर्सना अ‍ॅडमिनचा दणका, 10 हजारांचा दंड वसूल!
Whatsapp group
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 8:26 AM

अमरावती : बहुतांश व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे (WhatsApp group) काही नियम असतात, काही अटी असतात. पण सगळेच जण ते पाळतात का? राजकीय पोस्ट करू नका, फक्त गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज करू नका, मजकूर कॉपी-पेस्ट करू नका, असे अनेकदा अ‍ॅडमिन बजावत असतो. पण काहीजण हटकून तेच करत असतात. ग्रुपमधील अशा सदस्यांबाबत काय करायचे, हा प्रश्न अ‍ॅडमिनसमोर असतो. पण अमरावतीच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनने अशा सदस्यांना चक्क दंड ठोठावला आहे. इतकेच नव्हे तर तो दंड वसूल करून सदर रक्कम कोव्हिड सेंटरला देणगी म्हणून दिली. (admin collected fine of Rs 10,000 from group members for sending greetings in WhatsApp group)

आमची जिल्हापरिषद, असे या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे नाव आहे. मोर्शी पंचायत समितीत शिक्षक असलेले मनीष काळे हे या ग्रुपचे अ‍ॅडमिन आहेत. या ग्रुपवरसुद्धा विविध प्रकारचे ज्ञान, सामाजिक, शुभेच्छा संदेश, राजकीय पोस्टचा भरणा सुरुवातीला होता, शेवटी या पोस्ट रोखण्यासाठी मनीष काळे यांनी एक नियमावली केली. दंड किंवा सहकार्य, असा सरळसोपा नियम केला. नियमावली पाळा अन्यथा दंड भरा, असा इशारा ग्रुपवर 24 मेपासूनच दिला जात होता. तरीही ग्रुपमधील काही सदस्यांनी नियम मोडलाच. अखेर काळे यांनी दंड केला. विशेष म्हणजे दंड झालेल्या सर्वानीच दंड भरण्याचे मान्यदेखील केले.

दंड सरळ बँकेत भरायचा आहे. दंडापोटी सध्या जवळपास 10 हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली. ती रक्कम जिल्हा परिषदेच्या कोव्हिड सेंटरला देणगी म्हणून देण्यात आली. सभासदांनी नियम मोडला म्हणून त्यांच्याकडून दंड वसूल करणारा आपली जिल्हा परिषद हा राज्यातील पहिलाच ग्रुप आहे.

इतर बातम्या

WhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा

WhatsApp Payments ची कमान Manesh Mahatme यांच्या हाती, अमेझॉन, एअरटेल मनीसोबतचा अनुभव कामी येणार?

Twitter ची मुजोरी सुरुच, भारताच्या नकाशासोबत छेडछाड, जम्मू-काश्मीर, लडाख वेगळे देश असल्याचं दर्शवलं

(admin collected fine of Rs 10,000 from group members for sending greetings in WhatsApp group)

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.