बीडमधील नामांकित बँकेवर प्रशासकाची नियुक्ती, पंकजा मुंडेंच्या खंद्या समर्थकाला धक्का, ठेवीदारांंमध्ये संभ्रम
द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या संचालकपदी थेट प्रशासक नेमल्यामुळे ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड : द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या संचालकपदी थेट प्रशासक नेमल्यामुळे ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेच्या कामकाजात तक्रारी आल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार आयुक्तांनी ही कारवाई केलीय. (administrator appointed on dwarkadas mantri nagari sahakari bank of beed district)
पंकजा मुंडेंच्या निटकवर्तीयांना धक्का
बीड येथील द्वारकरादास मंत्री नागरी सहकारी बँक सहकार क्षेत्रातील मोठे नाव असलेले सुभाष सारडा यांच्या ताब्यात होती. मागील अनेक वर्षांपासून सारडा यांचेच या बँकेवर वर्चस्वर आहे. तर दुसरीकडे सारडा भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत. पंकजा मुंडे यांच्या समर्थकाचे वर्चस्व असलेल्या बँकेवर ही कारवाई करण्यात आल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बँकेच्या कामकाजात अनेक तक्रारी
मिळालेल्या माहितीनुसार द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक बीडमधील एक नामांकित अशी बँक आहे. या बँकेचे हजारोंच्या संख्येने ठेवीदार असून त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून बँकेच्या कामकाजामध्ये अनेक तक्रारी आल्या होत्या. याच तक्रारींची दखल घेत रिझर्व्ह बँकेने मंत्री सहकारी बँकेवर प्रशासक नेमला आहे.
ठेविदारांनी घाबरू नये, बँकेची स्थिती उत्तम
दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार आयुक्तांनी या बँकेवर जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांना प्रशासक म्हणून नियुक्त केलं आहे. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय सुभाष सारडा यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात असले तरी दुसरीकडे ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर बोलताना प्रशासक देशमुख यांनी घाबरण्याचं कारणं नसल्याचं म्हटलं आहे. बँकेची परिस्थिती उत्तम आहे. लवकरच बँक पूर्ववत होईल असे देशमुख म्हणाले आहेत.
इतर बातम्या :
‘मी पाच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं’, अजितदादा चुकून चुकले! जाहीर सभेत ‘कानाला खडा’
कमळवाला आणि कमला, भातखळकरांच्या ट्विटनं भुवया उंचावल्या, नेटकरी म्हणतात, Tweet Of The Day
(administrator appointed on dwarkadas mantri nagari sahakari bank of beed district)
Video | SambhajiRaje | सगळ्यांचे पत्ते कट झाले पण दानवेंचा पत्ता कट होत नाही : संभाजीराजे छत्रपती@YuvrajSambhaji #SambhajirajeChhatrapati #RaosahebDanve #Pune #Maharashtra
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/wz3upDMQ6b
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2021