मुलगी झाल्याचा आनंद वेगळाच, अशी काढली गावात मिरवणूक की सारेच अचंबित

लग्नाच्या सात वर्षानंतर मनीषा पाटील यांना दिवस गेले. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी बाळ झालं. त्याचा आनंद या दाम्पत्याच्या मनात होता.

मुलगी झाल्याचा आनंद वेगळाच, अशी काढली गावात मिरवणूक की सारेच अचंबित
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 2:50 PM

भूषण पाटील, प्रतिनिधी, कोल्हापूर : कुणाला कशात आनंद मिळेल काही सांगता येत नाही. कुणी नोकरी लागल्याचा आनंद साजरा करतो. तर कुणी मुलंबाळ झाल्याचा आनंद साजरा करतो. आनंदाला काही सीमा नसते. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीनं आनंद साजरा करत असतो. ही गोष्ट आहे कोल्हापुरातल्या पाटील कुटुंबीयांची. गिरीश पाटील हे सॉफ्टवेअर इंजिनीअर. लग्न होऊन सात वर्षे झाली. पण, मुलबाळं नव्हतं. त्यामुळे हे दाम्पत्य काहीसे नाराज होते. नातेवाईक वारंवार विचारणा करायचे. लग्नाला चार-पाच वर्षे झालीत. अजून काही नाही का. यामुळे त्यांचं मन खट्टू व्हायचं. पण, इलाज नव्हता. बऱ्याच ठिकाणी औषधोपचार घेतला. पण, काही फायदा झाला नाही.

KOLHAPUR 2 N

लग्नाच्या सात वर्षानंतर मनीषा पाटील यांना दिवस गेले. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी बाळ झालं. त्याचा आनंद या दाम्पत्याच्या मनात होता. त्यामुळे गिरीश पाटील यांनी मुलीची चक्क हत्तीवरून वरात काढायचं ठरवलं. या त्यांच्या कृतीमुळे सारे अचंबित झाले.

हे सुद्धा वाचा

चक्क हत्तीवरून मिरवणूक

घरी मुलगी जन्माला आले की काही ठिकाणी नाराजीचा सूर असतो. मात्र कोल्हापुरातील पाचगावमधल्या पाटील कुटुंबीयांनी एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला. पाचगावमधील शांतीनगरमध्ये राहणाऱ्या पाटील कुटुंबीयांनी घरी जन्माला आलेल्या मुलगी इरा हिची चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत स्वागत केलं.

ढोल ताशाच्या गजरात स्वागत

सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेले गिरीश आणि मनीषा पाटील यांना लग्नाच्या तब्बल आठ वर्षांनंतर मुलगी झालीय. त्या आनंदात पाटील कुटुंबीयांनी आज इराच हत्तीवरून मिरवणूक काढत तसंच ढोल ताशाच्या गजरात स्वागत केलं.

मनीषा पाटीलही भारावल्या

इतकंच नाही तर यावेळी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा संदेश या निमित्ताने पाटील कुटुंबीयांनी दिला आहे. एरवी मुलगी झाल्यानंतर घरच्या दूषण दिली जातात. मात्र गिरीश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलीचे केलेले स्वागत पाहून आई मनीषा पाटीलही भारावून गेल्या.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.