आदिवासी बांधवांचे आंदोलन अखेर मागे; मागण्या मान्य झाल्या का..?
सुरजाड प्रकल्पाच्या अवजड वाहतुकीबाबत कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाविषयी आदिवासी बांधवांना आश्वासनं देऊन आंदोलकांच्या मागण्यांचा विचारपूर्वक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे गेल्या तीन दिवसांपासून रणरणत्या उन्हात सुरू असलेले ठिय्या आंदोलन आज अखेर मागे घेण्यात आले. वेगवेगळ्या मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी ठिय्या आंदोलन पुकारले होते. ज्यासाठी आंदोलन करण्यात आले होतेत त्या मागण्यांवर आदिवासी ठाम होते. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. उपविभागीय अधिकारी संजय डवले आणि तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र आंदोलकांना दिल्यावर आंदोलकांकडून सांगता करण्यात आली.
आंदोलकांच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासनाकडून ठोस आश्वासन देण्यात आल्यानंतर पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी बहुल गावांना पेसा अंतर्गत सामील करण्याची कारवाई पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही अश्वासन देण्यात आले आहे.
त्यामुळे हे आंदोलन मागे घेत असल्याचेही आदिवासी बांधवांनी सांगितले. जबरनजोत शेतकऱ्यांच्या वनजमीनीवरील हक्का बाबत 5 मे पर्यंत नोटीस काढण्यात येईल असंही यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
इको सेन्सिटिव्ह झोनबाबत वनविभागाशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आदिवासींच्या या मागण्यांकडे
तर सुरजाड प्रकल्पाच्या अवजड वाहतुकीबाबत कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाविषयी आदिवासी बांधवांना आश्वासनं देऊन आंदोलकांच्या मागण्यांचा विचारपूर्वक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
50 टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, 50 वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला वाढविण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी आदिवासींनी ठिय्या आंदोलन केले होते.मात्र आता प्रशासनाकडून अश्वासन देण्यात आल्याने आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.