ज्याच्या पोटाची खळगी भरायला गेला तोच जीवावर उठला, ऊसतोड कामगाराचा असा झाला अंत
दामु सापनर हे ज्येष्ठ नागिरक त्यांनी अख्य आयुष्य कामगार म्हणून काढलं. त्यामुळे बैल हा काही त्यांच्यासाठी नवीन विषय नव्हता. पण, हा बैल मारकुंडा निघाला.
अहमदनगर : ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे, याचा कधीकधी प्रत्यय येतो. या घटनेतही तसंच घडलं. बैल हा मुका जनावर आहे. जे दिलं ते खातो. म्हणून कामगार त्याला चारा द्यायला गेला. पण, त्या बैलाने कामगाराला शिंग मारलं. यात कामगार गंभीर जखमी झाला. त्यानंतर थोड्या वेळाने त्याचा मृत्यू झाला. माणसापेक्षा जनावरं बरी असंही म्हटंल जातं. पण, काही जनावरसुद्धा घातक असतात. अशा मारकुंड्या बैलाने या ऊस कामगाराचा बळी घेतला. बैलाबद्दल कितीही राग व्यक्त केला तरी तो बैलचं आहे शेवटी. त्याला काही शिक्षा होणार नाही. जीव मात्र कामगाराचा गेला.
बैलाने शिंग मारले
बैलाला चारा देत असताना स्वतःच्याच बैलाने शिंग मारले. ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे. दामु सापनर वय वर्षे ५८ असे या ऊसतोड कामगाराचे नाव आहे. ते मूळचे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील रहिवासी होते. कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना बैलगाडी यार्डात ही दुर्दैवी घटना घडलीय.
बैलाबद्दलचा अंदाज चुकला
दामु सापनर हे ज्येष्ठ नागिरक त्यांनी अख्य आयुष्य कामगार म्हणून काढलं. त्यामुळे बैल हा काही त्यांच्यासाठी नवीन विषय नव्हता. पण, हा बैल मारकुंडा निघाला. त्यामुळे या बैलाने सरळ शिंगचं मारलं. बैलाला आपण चारा टाकतो. त्यामुळे तो काही आपल्याला इजा पोहचवणार नाही, असं दामु यांना वाटलं. पण, त्यांचा अंदाज चुकला आणि त्यांना जीव गमवावा लागला.
कामगारांच्या सुरक्षेचे काय?
ऊस तोडण्याची काम जोमात सुरू आहे. कालच एका ऊस कामगाराचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. नऊ तासाच्या झुंडीनंतर त्याने प्राण सोडले. पाच वर्षीय मुलाचा मृतदेहच बाहेर आला. ही घटना ताजी असताना आज बैलाने शिंग मारल्याने ऊसतोड कामगार गेला. अशा या असंघटित कामगारांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. काल बालक गेला आणि आज कामगार गेला.