कामगाराचा 5 वर्षीय मुलगा बोअरवेलमध्ये पडला; NDRF चे 9 तास शर्थीचे प्रयत्न पण…
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे ऊसतोड मजुराचा लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडलाय. सागर बारेला असं बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचं नाव आहे.
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे ऊसतोड मजुराचा लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडलाय. सागर बारेला असं बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचं नाव आहे. त्याचं वय साधारण पाच वर्षे आहे. मुलगा बोअरवेलमध्ये पडल्यामुळे कोपर्डी परिसरात खळबळ उडाली. परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी पोहोचले. मुलाला काढण्यासाठी 9 तास प्रयत्न करण्यात आले. पण, ते व्यर्थ ठरले. बारेला यांचे कुटुंबीय मध्य प्रदेशच्या बुऱ्हानपूर जिल्ह्यातील आहेत. ते कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगर कारखान्यात ऊस तोडणीसाठी आले होते.
नऊ तास शर्थीचे प्रयत्न व्यर्थ
बुधाजी बारेला या ऊसतोड मजुराचा पाच वर्षाचा सागर नावाचा मुलगा सायंकाळच्या सुमारास कोपर्डी येथे खेळत होते. तेवढ्यात तो मुलगा बोअरवेलमध्ये पडलाय. सहा वाजतापासून त्या मुलाला काढण्यासाठी ग्रामस्थ आणि प्रशासन शर्तीचे प्रयत्न केले. 9 तासांच्या प्रयत्नाने बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढले. मात्र मुलाचे प्राण वाचवण्यात अपयश आहे. बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा शोध कार्यासाठी NDRF टीमकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. पण, हे शर्थीचे प्रयत्न अपयशी ठरले.
एनडीआरएफची टीम दाखल
पोलीस आणि ॲम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती. बोअरवेलमध्ये मुलाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. सागर तब्ब्ल अकरा फूट खोल अडकला होता. कामगार कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या शेतात ऊस तोड करत होते. एनडीआरएफची टीम जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाली होती. शेवटी रात्री अडीच वाजता सागरचा मृतदेह बाहेर काढावा लागला.
शेवटी मृतदेह बाहेर निघाला
कर्जत तालुका प्रशासनही घटनेवर लक्ष ठेवून होते. प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस कर्मचारी श्याम जाधव, गोवर्धन कदम, राहुल खरात आणि जितेंद्र सरोदे हेही घटनास्थळी उपस्थित झाले. गावकऱ्यांच्या मदतीने मदतकार्य राबवण्यात आले. कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम तळ ठोकून बसले होते. जेसीबीच्या साह्याने खोदकाम करण्यात आले. पण, शेवटी मुलाचा मृतदेहच बाहेर काढावा लागला.