AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरच्या श्रीगोंद्यात भीषण अपघात, कारची ऊसाच्या ट्रेलरला धडक, तीन मित्रांचा तो प्रवास ठरला अखेरचा

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. श्रीगोंदा (Shrigonda) येथून काष्टी (Kashti)येथील मित्राला सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार (Car Accident ) धडकल्याने भीषण अपघात झाला.

अहमदनगरच्या श्रीगोंद्यात भीषण अपघात, कारची ऊसाच्या ट्रेलरला धडक, तीन मित्रांचा तो प्रवास ठरला अखेरचा
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 8:55 AM

अहमदनगर : जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. श्रीगोंदा (Shrigonda) येथून काष्टी (Kashti)येथील मित्राला सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार (Car Accident ) धडकल्याने भीषण अपघात झाला. ही घटना मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. या घटनेत कार मधून प्रवास करणाऱ्या तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार धडकून तिघांचा मृत्यू झाल्यानं काष्टी गावावर शोककळा पसरली आहे. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एका जणाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी अपघातावेळी तातडीनं बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. या अपघातात राहुल आळेकर, केशव रायकर, आकाश खेतमाळीस या तिघांचा मृत्यू झाल्यानं गावकऱ्यांना धक्का बसलाय.

तिघेजण कुठे चालले होते

राहुल सुरेश आळेकर वय 22,केशव सायकर वय 22,आकाश रावसाहेब खेतमाळीस वय 18 हे तिघे मित्र कारमधून श्रीगोंदा येथून काष्टीकडे जात होते.राहुल आणि आकाश हे आपला मित्र केशव सायकरला घरी सोडविण्यासाठी काष्टीला जात असताना अपघात झाला.

अपघात कुठं झाला?

राहुल आळेकर, केशव सायकर आणि आकाश खेतमाळीस हे तिघेजण कारमधून प्रवास करत होते. मध्यरात्री श्रींगोदा काष्टी रस्त्यावरील हॉटेल अनन्या जवळ ऊसाच्या ट्रेलरला धडक दिल्यानं अपघात झाला. ही घटना मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळतात अनन्या हॉटेलमधील व्यक्तींना घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त युवकांना कारमधून बाहेर काढले. यावेळी केशव सोयकर आणि आकाश खेतमाळीस या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याच समोर आलं. तातडीनं रुग्णवाहिका बोलावून जखमी राहुल याला श्रीगोंद्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.एकाच वेळी तीन मित्रांच्या अपघाती मृत्यूमुळं काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या:

Solapur : सोलापूर दूध संघाची निवडणूक होणारच, बिनविरोधची शक्यता धुसर ; दिग्गज नेत्यांची बैठक निष्फळ

Video : ‘आता मी तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडला’, गुलाबराव पाटल्यांच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये हशा

भागवत कराड यांच्या घरावर मोर्चाचा प्रयत्न; काँग्रेसच्या 120 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Ahmedagar Shrigonda car accident three friends died in the incidents

इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.